Chilli Chicken Recipe: घरच्या घरी बनवा खास स्वादिष्ट चिली चिकन

Easy Boneless Chilli Chicken Recipe: नॉन व्हेज डिश आवडत असेल तर चिली चिकन नक्की ट्राय करा. ही डिश फ्राइड चिकन नूडल्स किंवा राइससोबत खाल्लं जाऊ शकतं. येथे जाणून घ्या याची रेसिपी.

Chilli Chicken Recipe (Image source: tajmahalpoznan)
चिली चिकन (Image source: tajmahalpoznan)  |  फोटो सौजन्य: Instagram

नॉन व्हेज डिश आवडत असेल तर चिकनची ही डिश तुम्हांला खूप आवडेल. चिकनची एक झटपट बनणारी ही रेसिपी आहे. घरी बनवायला ही रेसिपी खूप सोपी आहे. तसेच, याची चव देखील उत्कृष्ट आहे. ही इंडो चायनीज डिश खूप लोकप्रिय आहे. हे तुम्ही ड्राय किंवा ग्रेव्ही मिळून बनवू शकता.  नूडल्स किंवा फ्राइड राइससोबत ही डिश खाल्ल्यास याची चव दुप्पट चांगली लागले. म्हणून पुढच्या वेळी घरी पार्टी करायची झाल्यास चिली चिकन बनवण्यास विसरू नका. येथे जाणून घ्या त्याची अगदी सोपी रेसिपी ....

चिली चिकनसाठी लागणारं साहित्य 

 • 400 ग्रॅम बोनलेस चिकन
 • 1/2 कप कॉर्न फ्लोर
 • 1/2 चमचा लसणाची पेस्ट
 • 1/2 चमचा आलं पेस्ट
 • 2 मोठे चमचे कापलेली हिरवी मिरची
 • 2 चमचे व्हिनेगर
 • 1/2 कप तेल
 • 1 अंड
 • 2 कप कापलेला कांदा
 • 1 मोठा चमचा सोया सॉस
 • 1 कप पातीचा कांदा
 • 1/2 चमचा मीठ

चिली चिकन बनवण्याची कृती

 1. ही स्वादिष्ट चिकन रेसिपी तयार करण्यासाठी एका भांड्यात चिकन, अंड, आलं-लसणाची पेस्ट आणि कॉर्न फ्लोर एकत्र करून घ्या.
 2. त्यानंतर त्या भांड्यात पुरेसं पाणी टाकून चिकनचे तुकडे मसाल्यांसोबत चांगलं एकत्र करून घ्या.
 3. चिकनला व्यवस्थित मसाला लावल्यानंतर चिकन 1-2 तासांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्या. 
 4. 1-2 तासानंर मॅरिनेट केलेलं चिकन बाहेर काढून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून चिकनचे तुकडे फ्राय करून घ्या आणि प्लेटमध्ये ठेवा. 
 5. दुसरीकडे मध्यम आचेवर एका वेगळ्या पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करा. 
 6. त्यात कांदा टाका आणि 2-3 मिनिटांसाठी परता. कांदा शिजल्यानंतर हिरवी मिरची टाकून पुन्हा एकदा मिश्रण एकत्र करून घ्या.
 7. थोड्या वेळानंतर त्यात सोया सॉस, व्हिनेगर, चिकन आणि मीठ टाका. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून एकजीव करा. 

डिश झाल्यानंतर चिली चिकन एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यावर कांद्याची पात आणि भाजलेले तीळ टाकून गार्निश करा. नॉन व्हेज खवय्ये असलेल्या लोकांना ही डिश खूप आवडेल. घरच्या घरी झटपट होणारी ही रेसिपी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी