Christmas 2021 Black Forest Cake Recipe अंडी आणि ओव्हनशिवाय घरी बनवा ब्लॅक फॉरेस्ट केक

Black Forest chocolate cake recipe ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट केक तयार करण्याची सोपी रेसिपी

 Black Forest chocolate cake
ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट केक 
थोडं पण कामाचं
 • अंडी आणि ओव्हनशिवाय घरी बनवा ब्लॅक फॉरेस्ट केक
 • घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने केक तयार करुन तो खाण्याची मजा औरच
 • ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट केक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

Black Forest chocolate cake recipe ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण जवळ आला आहे. या सणाच्या निमित्ताने केक खाण्याची प्रथा आहे. सर्व धर्मिय नाताळच्या निमित्ताने केक खाऊन दिवस साजरा करतात. बेकरीत अनेक प्रकारचे आकर्षक आणि चविष्ट केक तयार केले जातात. हे केक खरेदी करुन खाल्ले जातात. पण घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने केक तयार करुन तो खाण्याची मजा औरच आहे. चला तर मग आज जाणून घेऊ अंडी आणि ओव्हनशिवाय कसा तयार करायचा ब्लॅक फॉरेस्ट केक.

'ब्लॅक फॉरेस्ट केक'ची सोपी रेसिपी Christmas 2021 Black Forest Cake Recipe

ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट केक (Black Forest chocolate cake) तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

 1. मैदा- 3/4 कप
 2. गरम दूध - अर्धा कप
 3. कंडेन्स्ड दूध - अर्धा कप
 4. रिफांइड तेल - 1/4 कप
 5. साखर - 1/4 कप
 6. चोको चिप्स - 2 चमचे
 7. कोको पावडर - 1/4 टीस्पून
 8. कॉफी - 1 टीस्पून
 9. बेकिंग पावडर - 1 टीस्पून
 10. बेकिंग सोडा - अर्धा टीस्पून
 11. चेरी - 2 टीस्पून

कृती

 1. ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट केक तयार करण्यासाठी प्रथम एक मोठा वाडगा घ्या आणि त्यात चोको चिप्स, कॉफी आणि गरम दूध घालून, ढवळून चांगले एकजीव करा.
 2. या मिश्रणात आता कंडेन्स्ड मिल्क, साखर आणि रिफाइंड तेल घालून ढवळून घ्या.
 3. मिश्रणात आता मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि कोको पावडर घालून मळून पीठाचा गोळा तयार करा.
 4. केकचा साचा घ्या आणि त्यात पीठ घाला
 5. साच्यात पीठ ओतण्यापूर्वी साच्याला बटरने अथवा तुपाने चांगले ग्रीस केल्याची खात्री करा नंतर अर्ध्यापर्यंत भरा
 6. आता कुकरमध्ये मीठ टाकून स्टँडवर ठेवा आणि गरम होऊ द्या.
 7. यानंतर त्यात केक ठेवा आणि वीस ते तीस मिनिटे शिजू द्या.
 8. टूथपिक घालून केक शिजला आहे का ते तपासा
 9. जर शिजला असेल तर गॅस बंद करा आणि केक थंड होऊ द्या.
 10. यानंतर केक काढा आणि त्यावर व्हिपिंग क्रीम पसरवा
 11. त्यात किसलेले चॉकलेट, चेरी, ड्रायफ्रुट्स टाकून सजवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी