Click to know the meaning of what happened in the dream : निद्रावस्थेत अनुभवास येणाऱ्या प्रतिमा, वस्तू , व्यक्ती, घटना, भावना म्हणजे स्वप्न. स्वप्न अनुभवताना त्यात जे घडते, ते स्वप्नदर्शकाला, म्हणजे स्वप्न पाहणाऱ्याला खरे वाटते पण ते खरे नसते, हे निद्रावस्था संपल्यानंतर लक्षात येते. तर मानशास्त्रज्ञांच्या मते स्वप्न म्हणजे माणसाचे असे विचार जे अद्याप अपूर्ण आहेत किंवा असे विचार जे त्याच्या मनात भीती निर्माण करतात तेच प्रतिमा, वस्तू , व्यक्ती, घटना, भावना यांच्या रुपाने निद्रावस्थेत त्याच्या समोर येतात. पण ज्योतिषशास्त्रात स्वप्नशास्त्र नावाची एक शाखा आहे. स्वप्नशास्त्र या शाखेच्या अभ्यासकांच्या मते स्वप्नांमध्ये मोठा अर्थ दडला असतो. लक्षात राहिलेल्या स्वप्नात काय बघितले हे महत्त्वाचे आहे आणि काही वेळा ही स्वप्न महत्त्वाच्या घटनेची सूचना देऊ शकतात असे स्वप्नशास्त्राचे अभ्यासक सांगतात. थोडक्यात सांगायचे तर, स्वप्नांविषयी वेगवेगळ्या तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. आपला कोणावर विश्वास आहे हे महत्त्वाचे आहे.