Onion Chutney Recipe : ...तर दीर्घकाळ टिकेल कांद्याची चटणी

Onion Chutney Recipe In Marathi : कांद्यापासून तयार करायची रुचकर आणि जास्त काळ टिकणारी चटणी...

Onion Chutney Recipe
...तर दीर्घकाळ टिकेल कांद्याची चटणी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कांद्यापासून तयार करायची रुचकर आणि जास्त काळ टिकणारी चटणी...
  • कांद्याची चटणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
  • कांद्याची चटणी तयार करण्यासाठी करायची कृती

Onion Chutney Recipe In Marathi : कांदा कापून थोडा वेळ ठेवला तर त्याचा उग्र वास येऊ लागतो. कांद्याचा वापर करून तयार केलेली चटणी काही तासांनंतर खराब होण्याचा धोका असतो. यामुळेच अनेकजण चटणीत कांदा वापरणे टाळतात. पण आज आम्ही तुम्हाला कांद्याची चटणी बनवण्याची वेगळी पद्धत सांगणार आहोत. ही पद्धत वापरल्यास कांदा वापरून तयार केलेली चटणी जास्त काळ टिकेल. चला तर मग जाणून घेऊ कांद्यापासून तयार करायची रुचकर आणि जास्त काळ टिकणारी चटणी...

कांद्यापासून तयार करायची रुचकर आणि जास्त काळ टिकणारी चटणी...

साहित्य / कांद्याची चटणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य : 4 मोठे कांदे, 4 लाल मिरच्या, 1 चमचा चिंचेची पेस्ट, 4 चमचे तेल, 3 चमचे मोहरी, अर्धा चमचा उडदाची डाळ, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार.

कृती / कांद्याची चटणी तयार करण्यासाठी करायची कृती : कांद्याचे बारीक तुकडे चिरून घ्या. एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करा. त्यामध्ये कांदा भाजून घ्या. त्यात लाल मिरची टाकून भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये चिंचेची पेस्ट टाकून तळून घ्या. थंड केल्यानंतर कांद्याचे मिश्रण बारीक वाटून घ्या. आता एका भांड्यात दोन चमचे तेल गरम करा. त्यात मोहरी, उडदाची डाळ, कढीपत्ता, हिंग आणि मीठ टाकून फोडणी करा आणि ती फोडणी चटणीवर टाकून सर्व्ह करा.

कांद्यापासून तयार केलेली ही रुचकर चटणी दीर्घकाळ टिकेल. एका कोरड्या हवाबंद भांड्यात भरून ही चटणी फ्रीजमध्ये ठेवा. आता ही चटणी दीर्घकाळ सुरक्षित राहू शकेल.

चाळीशीनंतर स्टॅमिनासाठी पुरुषांनी खायचे पदार्थ

कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी