Daily Shaving Benefits : प्रत्येक पुरुषाने वाचलीच पाहिजे ही बातमी!

Daily Shaving Benefits, Amazing benefits of Daily Shaving apply these natural products, Every man should read  : जाणून घ्या दररोज शेव्हिंग करण्याचे अर्थात दाढी करण्याचे फायदे...

Daily Shaving Benefits
प्रत्येक पुरुषाने वाचलीच पाहिजे ही बातमी!  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक पुरुषाने वाचलीच पाहिजे ही बातमी!
  • दररोज शेव्हिंग करण्याचे अर्थात दाढी करण्याचे फायदे
  • चेहऱ्यावरील डेड स्किनचा थर निघून जातो

Daily Shaving Benefits, Amazing benefits of Daily Shaving apply these natural products, Every man should read  : पुरुषांमध्ये हल्ली दाढी ठेवण्याचा ट्रेंड आहे. प्रत्येकजण स्वतःला शोभून दिसेल अशा पद्धतीने दाढी ठेवतो. स्टायलिश बिअर्ड अर्थात स्टायलिश दाढी ठेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे दररोज दाढी करण्याऐवजी बिअर्ड ट्रिम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेकजण दररोज बिअर्ड ट्रिम करण्यात जास्त कम्फर्टेबल फील करतात. पण प्रत्यक्षात दररोज दाढी करणे अर्थात शेव्हिंग करणे चेहऱ्याच्या त्वचेसाठी जास्त लाभदायी आहे. जे दररोज व्यवस्थित दाढी करतात त्यांची चेहऱ्याची त्वचा कायम हेल्दी राहते. जाणून घ्या दररोज शेव्हिंग करण्याचे अर्थात दाढी करण्याचे फायदे...

1. डेड स्किन

प्रदूषण, उन यामुळे चेहऱ्याची त्वचा हळू हळू डॅमेज होते. चेहऱ्यावर डेड स्किनचा थर निर्माण होतो. दररोज दाढी केली (डेली शेव्हिंग) तर चेहऱ्यावरील डेड स्किनचा थर निघून जातो. चेहरा फ्रेश दिसतो. स्किन हेल्दी राहते. 

2. बॅक्टेरियांपासून संरक्षण

दाढीच्या केसांमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया राहू शकतात. हे बॅक्टेरिया चेहऱ्याची त्वचा डॅमेज करू शकतात. चेहऱ्याच्या त्वचेवर डाग निर्माण होण्याचा धोका असतो. पण डेली शेव्हिंग केल्यास हा धोका टाळता येतो. चेहऱ्याच्या त्वचेवर बॅक्टेरिया राहण्याचा धोका नगण्य करता येतो.

3. पीएच लेव्हल कंट्रोल

दररोज शेव्हिंग करताना दर्जेदार शेव्हिंग क्रीम, आफ्टर शेव्ह, ऑइल, जेल अशी प्रॉडक्ट वापरा. यामुळे त्वचेची पीएच लेव्हल बॅलन्स राहील.

4. शेव्हिंग करताना वापरायचे घरगुती उपाय

दाढी केल्यानंतर दूध, पपई, अॅपल साइडर या पदार्थांनी चेहऱ्याला हलक्या हाताने मॉलिश करा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या घरगुती उपायाने चेहऱ्याची त्वचा तजेलदार राहते.

मुंबईसह ६ शहरे कायमची पाण्याखाली जाण्याचा धोका

चित्रविचित्र पुतळे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी