Blackheads Removal Tips: डेड स्किन-ब्लॅकहेड्सला म्हणा Bye-Bye, लावा हा फेस पॅक; चेहऱ्यावर येईल Glow

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Oct 31, 2022 | 12:30 IST

Glowing Skin Tips: जर तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स असतील तर लेखात नमूद केलेला फेस पॅक लावून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. आम्ही ते बनवण्याची संपूर्ण पद्धत देखील शेअर केली आहे.

Blackheads Removal Tips
डेड स्किन-ब्लॅकहेड्सला म्हणा Bye-Bye, लावा हा फेस पॅक 
थोडं पण कामाचं
  • मुलतानी मातीमध्ये असे गुणधर्म असतात जे चेहऱ्यावरील सूज कमी करण्यास मदत करतात.
  • मुलतानी मातीने डेड स्किन आणि ब्लॅकहेड्सची (Dead skin and Blackheads) समस्याही दूर केली जाऊ शकते हे फार कमी लोकांना माहिती आहे.
  • मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता जेणेकरून ते नैसर्गिकरित्या चमकेल.

मुंबई: Dead Skin Removal Tips:  मुलतानी मातीचा (Multani Mati) वापर प्राचीन काळापासून केला जातो. हे अंघोळ करण्यासाठी आणि उबटान लावण्यासाठी देखील वापरले जाते. मुलतानी मातीमध्ये असे गुणधर्म असतात जे चेहऱ्यावरील सूज कमी करण्यास मदत करतात. पण मुलतानी मातीने डेड स्किन आणि ब्लॅकहेड्सची  (Dead skin and Blackheads) समस्याही दूर केली जाऊ शकते हे फार कमी लोकांना माहिती आहे. याशिवाय त्वचेची एलर्जी दूर करण्यासाठी हे गुणकारी मानले जाते. जर तुमची त्वचा निस्तेज झाली असेल, तर तुम्ही मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता जेणेकरून ते नैसर्गिकरित्या चमकेल. हे लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील हरवलेली चमक परत येईल. आज आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की, या फेस पॅकच्या मदतीने तुम्ही ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून कसे मुक्त होऊ शकता. चला जाणून घेऊया फेस पॅक कसा तयार करायचा.

आवश्यक साहित्य

हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला मुलतानी माती, चंदन, मध, हळद आणि दूध लागेल. या सर्व गोष्टी आपल्याकडे आधीपासून असतात. 

अधिक वाचा-  3 दिवसात 2 ग्रह बदलतील या राशी! 4 राशीच्या लोकांची होईल मजा

असा बनवा फेस पॅक 

मुलतानी मातीचा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम एक भाडं घ्या. त्यानंतर मुलतानी माती, चंदन, मध, हळद आणि दूध थोडे थोडे घालून मिक्स करावे. फेस पॅक तयार आहे.

हे आठवड्यातून अनेक वेळा वापरा

चेहऱ्यावर फेस पॅक लावा. पुढे चेहऱ्याच्या ज्या भागात ब्लॅकहेड्स आहेत त्या भागाला हलक्या हाताने मसाज करा. असे किमान 5 मिनिटे करत राहा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा आणि हा फेस पॅक पुन्हा चेहऱ्यावर लावा. त्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हातांनी मसाज करा आणि चेहरा थोडा वेळ कोरडा होऊ द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने तुमच्या ब्लॅकहेड्स आणि डेड स्किनची समस्या दूर होईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया याचा प्रयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Times Now Marathi याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी