Death Anniversary of Lal Bahadur Shastri 2023: भारताचे दुसरे पंतप्रधान (Prime Minister)लाल बहादूर शास्त्री ( Lal Bahadur Shastri)हे अतिशय साधे आणि स्वाभिमानी व्यक्ती होते. शास्त्री यांचा साधेपणा किती होता हे त्यांचा ताशकंद अधिवेशनातील पेहराव पाहून आपल्याला येतो. या अधिवेशनात ते एक खादीचा कोट टाकून उपस्थित राहिले होते. रशियाचे (Russia) पंतप्रधान अॅलेक्सी कोसिगिन (Alexey Kosygin) यांना शास्त्री यांची ही गोष्टी खूप विचित्र वाटली होती. त्यावेळी तेथे कडाक्याची थंडी होती. त्यामुळे रशियाच्या पंतप्रधानांना वाटत होतं की, शास्त्रींना या कपड्यात थंडीपासून वाचणं अशक्य राहील. यामुळे त्यांनी लालबहादूर शास्त्रींना एक कोट भेट दिला. कोसिगिन यांना वाटलं की, ते हा कोट परिधान करतील, परंतु तसे झाले नाही. ( Death Anniversary of Lal Bahadur Shastri 2023: Life history, Former Prime Minister Shastri was a super communist )
अधिक वाचा : गौतम अदानी 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला!
शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार, "लाल बहादूर शास्त्री यांनी दुसर्या दिवशीही त्यांचा जुना कोट परिधान केला होता. याविषयी रशियाचे पंतप्रधानांनी त्यांना त्याविषयी विचारले. तेव्हा शास्त्री म्हणाले की, तो कोट खरोखर उबदार आहे आणि मी तिला माझ्या क्रूच्या सदस्याला दिले आहे. कारण त्याने त्याचा कोट सोबत आणलेला नाही म्हणून मी त्याला दिला. यानंतर रशियन पंतप्रधानांनी त्यावेळी पाकिस्तान पंतप्रधान आणि भारताच्या पंतप्रधानांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात लाल बहादूर शास्त्री यांचे खूप कौतुक केलं. ते म्हणाले की, "आम्ही कम्युनिस्ट आहोत, पण पंतप्रधान शास्त्री हे सुपर कम्युनिस्ट आहेत."
अधिक वाचा : शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांचा अपघात
दरम्यान, शास्त्री यांचा जन्म हा 2 ऑक्टोबर 1904 रोजी मुगलसराय येथे झाला होता. त्यांचे वडील हे शिक्षक होते. शास्त्री जेव्हा दीड वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर शास्त्री यांची आई तीन मुलांसह आपल्या वडिलांच्या घरी राहू लागली. त्या लहानशा गावात शास्त्रींचे शालेय शिक्षण विशेष झाले नाही, पण गरिबीची परिस्थिती असतानाही त्यांचे बालपण आनंदात गेले.
अधिक वाचा : RRR: 'नाटू नाटू' गाण्याला मिळाला बेस्ट ऑरिजनल सॉन्ग अवॉर्ड
हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना वाराणसीमध्ये त्यांच्या काकांकडे राहायला पाठवण्यात आले. घरी सगळे त्याला 'नन्हे' नावाने हाक मारायचे. शाळेत जाण्यासाठी ते अनवाणी पायाने अनेक मैल चालत असे. ऐन उन्हाळ्यातही रस्ते प्रचंड उकाड्याचे असायचे तेव्हाही असेच जावे लागत होते. जसजसे ते मोठे झाले तसतसे लाल बहादूर शास्त्री यांना देशाच्या परकीय गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या लढ्यात अधिक रस वाटू लागला. भारतातील ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजपुत्रांचा महात्मा गांधींनी केलेला निषेध केला होता, ते पाहून शास्त्री खूप प्रभावित झाले होते.