10 March Dinvishesh । 10 मार्चला काय घडलं होतं? कोणाची जयंती-पुण्यतिथी, कोणती ऐतिहासिक घटना? जाणून घ्या...

10 March Dinvishesh । 10 मार्च रोजी काय घडले, इतिहासातील या दिवशी काय घडले, 10 मार्च. पहा कोणत्या ऐतिहासिक घटना घडल्या, कोणत्या प्रसिद्ध लोकांचा जन्म 10 मार्च रोजी झाला आणि कोणाचा मृत्यू झाला.

dinvishesh 10-march read in marathi
10 March Dinvishesh । 10 मार्चला काय घडलं होतं? कोणाची जयंती-पुण्यतिथी, कोणती ऐतिहासिक घटना? जाणून घ्या...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली.
  • ग्राहम बेल यांने दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला.
  • प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा

10 March Dinvishesh । 10 मार्च रोजी काय घडले, इतिहासातील या दिवशी काय घडले, 10 मार्च. पहा कोणत्या ऐतिहासिक घटना घडल्या, कोणत्या प्रसिद्ध लोकांचा जन्म 10 मार्च रोजी झाला आणि कोणाचा मृत्यू झाला.


महत्वाच्या घटना (10 MARCH)

10 मार्च 1862: अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली.
10 मार्च 1873: अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला.
10 मार्च 1922: प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा झाली.
10 मार्च 1952: केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.
10 मार्च 1972: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
10 मार्च 1977: युरेनस ग्रहाला शनी ग्रहासारखी कडी असल्याचा शोध लागला.
10 मार्च 1985: भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन अॅण्ड हेजेस चॅम्पियनशिप हि क्रिकेट स्पर्धा जिकली.
10 मार्च 1985: भारतीय क्रिकेट संघाने रवि शास्त्री यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब मिळाला.
10 मार्च 1998: भारतीय बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा जिंकली.

जन्म (10 MARCH)

10 मार्च 1628: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी लादेन यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १६९४)
10 मार्च 1918: गायक आणि अभिनेता सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटा गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९९७)
10 मार्च 1929: कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म.
10 मार्च 1945: केंद्रीय रेल्वे मंत्री माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर २००१ – मैनपुरी, उत्तर प्रदेश)
10 मार्च 1957: अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक ओसामा बिन लादेन यांचा जन्म. (मृत्यू: २ मे २०११)
10 मार्च 1974: ट्विटर चे सहसंस्थापक बिझ स्टोन यांचा जन्म.

मृत्यू (10 MARCH)

10 मार्च 1872: इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचे निधन. (जन्म: २२ जून १८०५)
10 मार्च 1897: पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)
10 मार्च 1940: रशियन कथा, कादंबरीकार आणि नाटककार बुल गाकॉव्ह मिखाईल यांचे निधन.
10 मार्च 1959: पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३)
10 मार्च 1971: कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८९४)
10 मार्च 1985: सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टंटिन चेरेनेन्को यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९११)
10 मार्च 1999: प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९१२)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी