24 february Dinvishesh : 24 फेब्रुवारीला काय आहे दिनविशेष, कोणाची जयंती-पुण्यतिथी, कोणती ऐतिहासिक घटना जाणून घ्या 

 24 february Dinvishesh : 24 फेब्रुवारी हा दिवस ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे. राजगड येथे छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म झाला होता.  कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले होते. 

dinvishesh 24 february read in marathi
 24 february Dinvishesh : 24 फेब्रुवारीला काय आहे दिनविशेष  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 24 फेब्रुवारी हा दिवस ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे.
  • . राजगड येथे छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म झाला होता.
  • कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले.

मुंबई :  24 फेब्रुवारी हा दिवस ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे. राजगड येथे छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म झाला होता.  कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले होते. 
 
 
 पाहूया काय आहे दिनविशेष 

24 फेब्रुवारी 1670: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म.
24 फेब्रुवारी 1822: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.
24 फेब्रुवारी 1918: इस्टोनिया देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
24 फेब्रुवारी 1920: नाझी पार्टीची स्थापना झाली.
24 फेब्रुवारी 1938: ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.
24 फेब्रुवारी 1942: व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.
24 फेब्रुवारी 1952: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
24 फेब्रुवारी 1961: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
24 फेब्रुवारी 1987: इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात १९८७ – ए या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.
24 फेब्रुवारी 2008: फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.
24 फेब्रुवारी 2010: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.


जन्म (24 FEBRUARY)

24 फेब्रुवारी 1670: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम, शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १७००)
24 फेब्रुवारी 1924: पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९८ – मुंबई, महाराष्ट्र)
24 फेब्रुवारी 1938: नायके इन्क चे सहसंस्थापक फिल नाइट यांचा जन्म.
24 फेब्रुवारी 1939: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च २०१२)
24 फेब्रुवारी 1942: भारतीय तत्त्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म.
24 फेब्रुवारी 1948: राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री जे. जयललिता यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर २०१६)
24 फेब्रुवारी 1955: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर २०११)

मृत्यू (24 FEBRUARY)

24 फेब्रुवारी 1674: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे.
24 फेब्रुवारी 1810: हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री कॅव्हँडिश यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १७३१)
24 फेब्रुवारी 1815: अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १७६५ – लिटिल ब्रिटन, पेनसिल्व्हानिया, यू. एस. ए.)
24 फेब्रुवारी 1936: मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.
24 फेब्रुवारी 1975: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८९५)
24 फेब्रुवारी 1986: भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १९०४)
24 फेब्रुवारी 1998: अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या ललिता पवार यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १९१६)
24 फेब्रुवारी 2011: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९२९)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी