25 February Dinvishesh : 25 फेब्रुवारीला काय आहे दिनविशेष, कोणाची जयंती-पुण्यतिथी, कोणती ऐतिहासिक घटना जाणून घ्या 

 25 February Dinvishesh in Marathi : 25 फेब्रुवारी हा दिवस ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे निधन झाले होते. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.

dinvishesh 25 february read in marathi share of social media and facebook, whatsapp, instagram to your friend and family
 25 februvary Dinvishesh : 25 फेब्रुवारीला काय आहे दिनविशेष  |  फोटो सौजन्य: Times Now

25 februvary Dinvishesh in Marathi : 25 फेब्रुवारी हा दिवस ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे निधन झाले होते.  कर्नल डिफनने चाकणचा  किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.

महत्वाच्या घटना (25 FEBRUARY)

  1. 25 फेब्रुवारी 1510: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.
  2. 25 फेब्रुवारी 1818: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.
  3. 25 फेब्रुवारी 1935: फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
  4. 25 फेब्रुवारी 1945: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
  5. 25 फेब्रुवारी 1945: दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  6. 25 फेब्रुवारी 1968: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  7. 25 फेब्रुवारी 1986: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.
  8. 25 फेब्रुवारी 1996: स्वर्गदारा तील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.

जन्म (25 FEBRUARY)

  1. 25 फेब्रुवारी 1940: बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९१४)
  2. 25 फेब्रुवारी 1894: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६९ – मेहराझाद, पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र)
  3. 25 फेब्रुवारी 1938: भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनिअर यांचा जन्म.
  4. 25 फेब्रुवारी 1943: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर २००१)
  5. 25 फेब्रुवारी 1948: चित्रपट अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा यांचा जन्म.
  6. 25 फेब्रुवारी 1974: हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९३)

मृत्यू (25 FEBRUARY)

  1. 25 फेब्रुवारी 1924: जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले.
  2. 25 फेब्रुवारी 1964: चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन.
  3. 25 फेब्रुवारी 1978: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९१)
  4. 25 फेब्रुवारी 1980: लेखिका व नाटककार गिरजाबाई महादेव केळकर यांचे निधन.
  5. 25 फेब्रुवारी 1999: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १९१२)
  6. 25 फेब्रुवारी 2001: ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
  7. 25 फेब्रुवारी 2016: भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९३७)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी