28 February Dinvishesh : 28 फेब्रुवारीला काय घडलं होतं? कोणाची जयंती-पुण्यतिथी, कोणती ऐतिहासिक घटना? जाणून घ्या...

28 February Dinvishesh: महान भौतिकशास्त्रज्ञ सर सी.व्ही. 1928 मध्ये 'रामन इफेक्ट'चा शोध लावण्यासाठी रामन यांना ओळखले जातात. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

dinvishesh 28 february read in marathi
28 Februvary Dinvishesh : 28 फेब्रुवारीला काय घडलं होतं? कोणाची जयंती-पुण्यतिथी, कोणती ऐतिहासिक घटना? जाणून घ्या... 
थोडं पण कामाचं
 • 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
 • 28 फेब्रुवारी 1963 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे निधन झाले.

Importance of 28th February: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1936 रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचे निधन झाले. 28 फेब्रुवारी 1963 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांचे निधन झाले. 

28 February Dinvishesh:

 1. 28 फेब्रुवारी 1849: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज 4 महिने 21 दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.
 2. 28 फेब्रुवारी 1922: इजिप्तला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
 3. 28 फेब्रुवारी 1928: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
 4. 28 फेब्रुवारी 1935: वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.
 5. 28 फेब्रुवारी 1940: बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.
 6. 28 फेब्रुवारी 1873: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचा जन्म. (मृत्यू: 11 जानेवारी 1954)
 7. 28 फेब्रुवारी 1897: मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: 23 ऑगस्ट 1974)
 8. 28 फेब्रुवारी 1901: रसायनशास्त्रज्ञ लिनस कार्ल पॉलिंग यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑगस्ट 1994)
 9. 28 फेब्रुवारी 1927: भारताचे 10 वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 2002)
 10. 28 फेब्रुवारी 1929: भारतीय-अमेरिकन संशोधन रंगास्वामी श्रीनिवासन यांचा जन्म.
 11. 28 फेब्रुवारी 1942: द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक ब्रायन जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: 3 जुलै 1969)
 12. 28 फेब्रुवारी 1944: संगीतकार व गीतकार रविन्द्र जैन यांचा जन्म.
 13. 28 फेब्रुवारी 1948: ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांचा जन्म.
 14. 28 फेब्रुवारी 1951: भारतीय क्रिकेटपटू करसन घावरी यांचा जन्म.
 15. 28 फेब्रुवारी 1926: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1874 – नाशिक)
 16. 28 फेब्रुवारी 1936: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचे निधन. (जन्म: 1 ऑगस्ट 1899)
 17. 28 फेब्रुवारी 1963: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे निधन. (जन्म: 3 डिसेंबर 1884)
 18. 28 फेब्रुवारी 1966: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचे निधन. (जन्म: 3 ऑगस्ट 1898)
 19. 28 फेब्रुवारी 1967: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लूस यांचे निधन. (जन्म: 3 एप्रिल 1898)
 20. 28 फेब्रुवारी 1986: स्वीडनचे 26 वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या. (जन्म: 30 जानेवारी 1927)
 21. 28 फेब्रुवारी 1995: कथा, संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचे निधन. (जन्म: 12 एप्रिल 1914)
 22. 28 फेब्रुवारी 1998: अभिनेता राजा गोसावी यांचे निधन. (जन्म: 28 मार्च 1925)
 23. 28 फेब्रुवारी 1999: औध संस्थानचे राजे भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांचे निधन.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी