Dishwashing Tips: थंडीत भांडी घासणं जीवावर येतं? या ट्रिक्स पडतील उपयोगी

रोजच्या जेवणानंतर भांडी घासण्याचा थंडीच्या काळात त्रास होतो. थंड पाण्यात हात घालू नये, असं वाटतं. या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून थंड पाण्याने भांडी धुताना होणारा त्रास कमी करता येणं शक्य आहे.

Dishwashing Tips
थंडीत भांडी घासणं जीवावर येतं? 
थोडं पण कामाचं
  • थंडीच्या काळात भांडी धुताना होतो त्रास
  • हातमोजे वापरून भांडी धुतल्यामुळे त्वचेचे संरक्षण
  • सोप्या घरगुती उपायांनी वाचवता येईल वेळ आणि ऊर्जा

Dishwashing Tips: देशभरात आता थंडीने (Cold) आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. सकाळी आणि संध्याकाळनंतर कडाक्याची थंडी पडू लागली आहे. अशा दिवसांत पाण्याशी संबंधित काम कऱणं अनेकांना नकोसं वाटतं. थंड पाण्यात हात घालणं आणि त्याच्याशी संबंधित कुठलंही काम करणं टाळण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यापैकी काही कामं टाळणं शक्यही असतं. मात्र अशी काही कामं असतात, जी दररोज करावीच लागतात. भांडी घासणं हे त्यापैकीच एक काम. रोजच्या जेवणानंतर भांडी घासण्याचा थंडीच्या काळात त्रास होतो. थंड पाण्यात हात घालू नये, असं वाटतं. या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून थंड पाण्याने भांडी धुताना होणारा त्रास कमी करता येणं शक्य आहे. 

ग्लब्सचा करा वापर

थंडीच्या काळात भांडी घासण्यासाठी हातमोज्यांचा म्हणजेच ग्लब्सचा वापर केल्यामुळे बरेच फायदे होतात. त्यामुळे थंड पाण्याचा थेट तुमच्या हाताच्या त्वचेशी संपर्क होत नाही. भांडी घासायला सुरुवात करण्यापूर्वी हातात मोजे घाला. त्याचप्रमाणे दिवसभराची भांडी साठवून न ठेवता, त्या त्या वेळी पडलेली भांडी लगेच घासून ठेवायला सुरुवात करा. त्यामुळेही थंड पाण्याचा त्रास कमी होईल. 

अधिक वाचा - Loneliness explained: एकटेपणा म्हणजे नेमकं काय? गर्दीतही का वाटतं सुनं सुनं? वाचा कारण

गरम पाण्याने भांडी धुवा

 भांडी धुवायला घेण्यापूर्वी सर्व भांड्यांमध्ये गरम पाणी ओता. काही वेळ हे पाणी तसंच ठेवा. त्यानंतर भांडी घासताना ती तुलनेने पटापट साफ होत असल्याचा अनुभव तुम्हाला येईल. 

मिठाचा करा वापर

करपलेली भांडी धुणं, हे सर्वात मोठं आव्हान असतं. बराच वेळ ही भांडी घासावी लागतात. अशी भांडी धुताना स्क्रब पँडवर मीठ आणि डिश वॉश लावून भांडी घासायला सुरुवात करा. त्यामुळे कमी कष्टात भांडी साफ होऊ लागतील. तुमचा वेळ आणि ऊर्जा या दोन्हीची बचत होऊ शकेल. 

अधिक वाचा - How twins born: कशी जन्माला येतात जुळी मुलं? केरळच्या गावची गोष्ट वाचलीत का?

भांडी चमकवण्याचा उत्तम उपाय

थंडीच्या काळात कमी कष्टात आणि कमी वेळेत भांडी चमकवण्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घेता येऊ शकते. त्यासाठी तुमच्या बेसिनमधील पाणी भरा आणि ते अडवून ठेवा. ते वाहून जाऊ देऊ नका. त्यात दोन चमचे बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि एक चमचा हायड्रोजन पॅरॉक्साईड घाला. 15 मिनिटं बेसीनमधील पाणी तसेच राहू द्या. त्यानंतर हे पाणी सोडून द्या आणि भांडी घासायला सुरुवात करा. भांडी तुलनेने लवकर साफ होतील आणि चमकू लागतील. 

अधिक वाचा : Kitchen tips : या टीप्समुळे तुमचे स्वंयपाक घर वाटेल Restaurant

डिस्क्लेमर - हिवाळ्याच्या काळात भांडी साफ कऱण्यासाठीच्या सामान्यज्ञानावर आधारित या काही टिप्स आहेत. तुम्हाला यााबाबत काही प्रश्न किंवा शंका असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी