Diwali 2021: या मिठाई प्रेशर कुकरमध्येही बनवता येतात, जाणून घ्या सोपी रेसिपी

Diwali 2021: आज आम्ही तुमच्यासाठी कुकरमध्ये मिठाई बनवण्याची सोपी रेसिपी आणली आहे, जी तुम्ही सणासुदीच्या निमित्ताने बनवू शकता.

These desserts can also be made in a pressure cooker
झटपट.. आणि स्वादिष्ट रेसिपी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रेशर कुकरमध्ये करा सोपी मिठाई
  • खीर आणि केशरी भात बनवा झटपट
  • दिवाळीत करा अशी सोपी मिठाई

Diwali 2021|  मुंबई:  भारत आपल्या परंपरा आणि स्वादिष्ट पाककृतींसाठी ओळखला जातो. प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी संस्कृती आणि पाककृती असते. येथे प्रत्येक सण विशिष्ट पद्धतीने साजरा केला जातो, अनेक पारंपारिक पदार्थ देखील तयार केले जातात. आता दिवाळीचा सणही येत आहे. सणासुदीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरी मिठाई बनवली जाते. पण बहुतेक महिलांना मिठाई बनवायला वेळ नसतो, त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका कारण आज आम्ही तुमच्यासाठी अशी रेसिपी आणली आहे, जी तुम्ही कुकरमध्येही सहज बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया..


खीर

Why meethey chawal, kheer and kadhi are specially prepared on Baisakhi - Times of India

सणासुदीत घरातील स्वयंपाकघरात विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. विशेषत: दिवाळी ( Diwali 2021) च्या सणाला मिठाई भरपूर बनवली जाते,अशा वेळी जर आपण सर्वात सोप्या आणि चविष्ट मिठाईबद्दल बोललो तर खीरीपेक्षा चांगले काय असू शकते. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की खीर ही एक अशी डिश आहे, जी प्रत्येक सणाला बनवली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही कुकरमध्येही खीर बनवू शकता


साहित्य

-फुल क्रीम दूध - 1 लिटर
-तांदूळ - १/२ कप
-साखर - १/२ कप
-मनुका -10-15
-हिरवी वेलची-१
-तूप - २ टीस्पून
-बदाम आणि काजू - 10-12 तुकडे करा
-केशर -5 -6 धागे


कृती

खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी तांदूळ सुमारे १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. थोड्या वेळाने तांदूळ चाळणीत गाळून घ्या.कुकर गॅसवर ठेवा आणि गरम होऊ द्या. कुकर चांगला तापला की त्यात थोडं तूप टाका. नंतर तुपात तांदूळ टाकून भात थोडा परतून घ्या. (स्वादिष्ट रामदाना खीर)
तांदूळ हलका परतून झाल्यावर त्यात दूध घालून कुकरचे झाकण बंद ठेवावे. एक शिट्टी आली की आच कमी करा. आता कुकरमधून वाफ काढा आणि सर्व्हिंग स्पूनने खीर नीट मिक्स करा. आता त्यात साखर घाला आणि साखर चांगली मिसळा. कढईत थोडं तूप टाका आणि तुपात काजू आणि बदाम हलके भाजून घ्या. काजू आणि बदाम चांगले भाजून झाल्यावर खीरीमध्ये घालून सर्व्हिंग स्पूनने चांगले मिसळा. तुमची खीर तयार आहे. तुम्ही थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. या सोप्या पद्धतीने, तुम्ही काही वेळात स्वादिष्ट खीर बनवू शकता आणि दिवाळीत या खीरीचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

केशरी भात

गोड केशरी भात

या सणासुदीच्या काळात जवळपास सर्वच लोकांच्या घरी काहीतरी गोड पदार्थ बनवले जातात. यावेळी तुम्ही गोडामध्ये काहीतरी वेगळे ट्राय करू शकता. हे एक स्वादिष्ट दक्षिण भारतीय मिष्टान्न आहे, ही मिठाई तुम्ही कुकरमध्येही सहज बनवू शकता, कसे ते जाणून घेऊया..


साहित्य

-4 धागे केशर
-२ कप - बासमती तांदूळ, भिजवलेले
-२ चमचे - तूप
-2 चमचे - मनुका
-7-8 काजू
-8 चमचे - साखर
-1/2 टीस्पून- वेलची पावडर

कृती

केशरी भात बनवण्यासाठी सगळ्यात आधी तांदूळ बनवण्यासाठी केशर गरम पाण्यात भिजवून ठेवावे. (केशर तांदूळ चिकट होतो, म्हणून या युक्त्या वापरून फुलवा) कढईत थोडं तूप गरम करून त्यात मनुके, काजू चांगले तळून घ्या. नंतर एका भांड्यात काढून बाजूला ठेवा. आता कुकरमध्ये तूप टाकून गरम करा. आता त्यात केशरचे पाणी घालून तांदूळ घाला. आता कुकर बंद करा. एक शिट्टी आली की त्यात साखर घाला आणि तांदूळ थोडा वेळ शिजू द्या. आता त्यात वेलची पूड टाका आणि नीट मिक्स करा. आता बेदाणे, काजू घालून गरमागरम सर्व्ह करा. तुमचा केशरी भात तयार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी