Diwali | दिवाळीच्या साफसफाईत या 5 गोष्टी मिळाल्या तर शुभ मानले जाते

Diwali | दिवाळी हा सण केवळ हिंदूंमध्येच नव्हे तर इतर समुदायांमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळीत घराची साफसफाई करताना अचानक या 5 गोष्टी आढळून आल्या, ज्या तुम्ही विसरला असाल तर समजून घ्या माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर वर्षाव होणार आहे.

It is considered auspicious to get these 5 things in Diwali cleansing
या 5 गोष्टी मिळाल्यास होईल लक्ष्मीचा वर्षाव...   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मीचा वास....
  • या 5 गोष्टी सापडणे अत्यंत शुभ...
  • साफसफाई करताना लक्षात घ्या या गोष्टी...

Diwali |  मुंबई : दिवाळी हा सण केवळ हिंदूंमध्येच नव्हे तर इतर समुदायांमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरी केली . यंदाची दिवाळी 4 नोव्हेंबर 2021, गुरुवारी साजरी होणार आहे. मां लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे आणि जिथे स्वच्छता असते तिथे तिचा वास असतो असे मानले जाते.


दिवाळीच्या अनेक दिवस आधीपासून लोक आपापल्या घरांची साफसफाई करण्यास सुरुवात करतात. घराची साफसफाई करताना अचानक या 5 गोष्टी आढळून आल्या, ज्या तुम्ही विसरला असाल तर समजून घ्या माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर वर्षाव होणार आहे.


या 5 गोष्टी दिवाळीत सापडणे शुभ मानले जाते.. 

Happy Diwali 2020: Choti Diwali messages, wishes, images, quotes and  rangoli designs to share on SMS, Whatsapp and Facebook

-साफसफाई करताना जर तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा कोणत्याही कपड्याच्या खिशात रुपये किंवा पैसे आढळले, तर ते खूप शुभ मानले जाते. 
असा पैसा कोणत्याही धार्मिक कार्यात लावल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि घरात सदैव कृपा राहते. 


- घर किंवा पूजेच्या ठिकाणी साफसफाई करताना मुरली किंवा मोर सापडणे खूप शुभ आहे. या गोष्टी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्री कृष्णाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या सापडण्यामुळे घरात लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.

-घराची साफसफाई करताना शंख किंवा कवडी आढळल्यास ते गंगेच्या पाण्याने स्नान करून धनाच्या ठिकाणी ठेवावे. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.

-स्वयंपाकघर साफ करताना, जर तुम्हाला एका ठिकाणी ठेवून विसरलेला तांदूळ सापडला.. तर ते तुमच्यासाठी खूप फलदायी  ठरू शकते. 


-घराची साफसफाई करताना कुठेही लाल कपडा दिसला तर तो जपून ठेवावा. असे मानले जाते की हा लाल कपडा सुवर्णमयी भविष्याचे संकेत ठरू शकते.

दरम्यान जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना निधी वाटप केल्याबद्दलची माहिती दिली. शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत असून अतिवृष्टीमुळे जून महिन्यात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी मदत म्हणून पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 350 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे, असे भुसे यांनी सांगितले.

मोदी सरकार आता सेवेत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ३१ टक्के महागाई भत्ता देणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होणार आहे. हा निर्णय १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहे. 

महागाई भत्त्यातील वाढीचा केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या १७.१४ लाख कर्मचारी आणि १८.६२ लाख निवृत्तीवेतन धारकांना लाभ होणार आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्याबाबतचे निर्णय ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आधारे घेतले जातात. या धोरणानुसार सरकारने ग्राहक मूल्य निर्देशांकाचा आढावा घेऊन महागाई भत्त्यात वाढ केली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी