Diwali Padwa 2021 Wishes in Marathi: दिवाळी पाडव्यानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, GIF's शेअर करुन पती-पत्नीच्या नात्याचा दिवस करा सेलिब्रेट

Diwali Padwa 2021 Wishes in Marathi: दिवाळी पाडव्या निमित्त पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि त्या बद्दल्यात पती पत्नीला छानसं गिफ्ट देतो. नवविवाहित दांपत्यासाठी पहिला दिवाळसण अगदी खास असतो.

diwali padwa 2021  wishes in marathi messages gif images greetings to share with your loved ones
दिवाळी पाडव्यानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश 
थोडं पण कामाचं
  • दिवाळीतील पाडवा म्हणजे पती-पत्नीच्या नात्याला सेलिब्रेट करणारा एक गोड सण.
  • दिवाळीत सगळीकडे आनंदी आनंद असतोच.
  • दिवाळी पाडव्या निमित्त पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि त्या बद्दल्यात पती पत्नीला छानसं गिफ्ट देतो.

Diwali Padwa 2021 Wishes in Marathi: दिवाळीतील पाडवा म्हणजे पती-पत्नीच्या नात्याला सेलिब्रेट करणारा एक गोड सण. दिवाळीत सगळीकडे आनंदी आनंद असतोच. या सणामुळे वैवाहिक दाम्पत्याच्या जीवनात आनंद देणाऱ्या पाडवा या सणाची भर पडते. दिवाळी पाडव्या निमित्त पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि त्या बद्दल्यात पती पत्नीला छानसं गिफ्ट देतो. नवविवाहित दांपत्यासाठी पहिला दिवाळसण अगदी खास असतो. यंदा ५ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आहे. या निमित्ताने महिला आपल्या पतीला ओवाळतात. परंतु, एखादा छानसा मेसेज पाठवून तुम्ही पतीराजांचा किंवा पत्नीचा दिवस अगदी खास करु शकता. सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) यावरुन मेसेज शेअर करुन तुम्ही सणाचा आनंद वाढवू शकता.


कार्तिक प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा.  दिवाळी पाडव्या दिवशी व्यापाऱ्यांचे नवे वर्ष सुरु होते. या दिवशी व्यापारी वहीपूजन किंवा चोपडी पूजन करुन नवीन खातेवह्या सुरु करतात. तर बलिप्रतिपदेनिमित्त मातीचे किंवा शेणाचे पाच गोळे करतात. बळी राजाची प्रतिकात्मक मूर्ती तयार करतात आणि त्याचे पूजन करतात.

शुभ मुहूर्त- (Shubh Muhurt)

सकाळी 6 वाजून 50 मिनिटं ते 10 वाजून 50 मिनिटांपर्यंत.
दुपारी 12 वाजून 25 मिनिटं ते 1 वाजून 45 मिनिटांपर्यंत. 


दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

Dawali Padwa Marathi wishes 2


तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,

सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,

पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!

Dawali Padwa Marathi wishes 3

पवित्र पाडवा साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!

उत्तम दिनाचे महात्म्य आहे! सुखद ठरो हा छान पाडवा!

त्यात असु दे अवीट आपल्या नात्याचा गोडवा!

शुभ पाडवा!

Dawali Padwa Marathi wishes 4

Dawali Padwa Marathi wishes

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळी ची नवी आरास,

स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे..

दिवाळी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा

Dawali Padwa Marathi wishes 1
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन

आला दिवाळी पाडवा

पणतीतल्या दिव्याच्या तेजाने

उजळेल आपल्या आयुष्याची वाट!

दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Dawali Padwa Marathi wishes 5

तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,

तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,

बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!

Dawali Padwa Marathi wishes 6

दिवाळीतील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आणि अर्थ आहे. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. वसुबारसपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. त्यानंतर पुढील 4-5 दिवस आनंदात कसे निघून जातात हे समजतही नाही. मग पुन्हा पुढील वर्षीच्या दिवाळीची आपण वाट पाहू लागतो. परंतु, येणारी प्रत्येक दिवाळी आपण आनंदी आणि खास नक्कीच करु शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी