Diwali 2021 : घरच्या घरी बनवा केशर मूग डाळ बर्फी...

Diwali Special recipe 2021 : सणासुदीत मिठाईला खूपच महत्त्व असतं. घरी आलेल्या पाहुण्याचं गोड खायला घालून तोंड गोड करा.. ही स्वादिष्ट बर्फी खाल्ल्यानंतर पाहुणे तुमची स्तुती नक्की करतील..

Make saffron moong dal barfi at home ...
दिवाळीसाठी खास चवीष्ट केशर मूग डाळ बर्फी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सणासुदीसाठी स्पेशल केशर मूग डाळ बर्फी
  • बनवायला सोपी.... खायला स्वादिष्ट...
  • शाही बर्फी... चवीष्ट...

Diwali Special recipe 2021 । मुंबई : दिवाळी अगदी तोंडावर आलीय.. फराळा बनवायला सुरुवात तुम्ही केलीच असेल? अशा सणासुदीत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी एखादी वेगळ्या चवीची बर्फी खायला मिळाली तर मग सोने पे सुहागा.. केशर मूगडाळ बर्फी ही त्यापैकीच एक.. बाजारात ही बर्फी सहज उपलब्ध आहे. पण, घरी केलेल्या बर्फीची बातच काही और असते.. चला तर मग जाणून घेऊया केशर मूगडाळ बर्फीची कृती.. 

साहित्य.. 


मूग डाळ - अर्धी वाटी
साखर - अर्धी वाटी
दूध - 1 वाटी
पिस्ता - 8-10
तूप - आवश्यकतेनुसार
केशर

कृती... 


स्टेप 1

केशर मूग डाळ बर्फी बनवण्यासाठी पहिल्यांदा पिस्त्याचे लांबट तुकडे करा. आता थोडे 2 चमचे दूध कोमट करून त्यात केशर टाका आणि भिजवून बाजूला ठेवा.


स्टेप 2

आता एका भांड्यात मूग डाळ घेऊन ती पाण्याने नीट धुवून घ्या. ही डाळ दोन कप पाण्यात किमान चार तास भिजत ठेवा.

स्टेप 3 

चार तासांनी डाळ चांगली भिजल्यावर त्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये टाकून चांगले वाटून घ्या. डाळ वाटताना फार बारीक वाटू नका. कमीत कमी पाणी घाला, यामुळे डाळ तळण्यासाठी कमी वेळ लागतो.


स्टेप 4


गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा, कढई गरम झाल्यावर त्यात तूप घाला. आता या तुपात मूग डाळीची पेस्ट घालून तळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या बर्फीमध्ये खवाही घालू शकता.

स्टेप 5

डाळ तळताना गॅसची आंच मंद ठेवा, किमान दहा मिनिटे तळून घ्या. जेव्हा डाळीतून सुगंध येऊ लागतो आणि डाळ गुळगुळीत आणि दाणेदार दिसू लागते, तेव्हा ही डाळ नीट तळलेली आहे असे समजावे. डाळ अगदी तपकिरी होईपर्यंत तळू नका. डाळ तळल्यावर ताटात काढा.


स्टेप 6

आता त्याच कढईत दूध घालून गरम करा आणि त्याच वेळी त्यात साखर घाला आणि वितळू द्या. आता त्यात तळलेली डाळा टाका आणि मिक्स करा. सतत ढवळत असताना शिजवा. नंतर त्यात केशरमिश्रित दूध घालून चांगले मिसळा. दूध पूर्णपणे शोषेपर्यंत डाळ तळून घ्या.


स्टेप 7

एका ताटात किंवा ट्रेमध्ये तुपाचे हात लावून ट्रे नीट ग्रीस करून घ्या.. 


स्टेप 8

आता हे मिश्रण ग्रीस केलेल्या प्लेटवर पसरवून त्यावर चिरलेला पिस्ता टाकून दाबून घ्या. आता थंड होऊ द्या. पसरलेले मूग डाळीचे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे चौकोनी तुकडे करा. तुमची केसर मूग डाळ बर्फी तयार आहे, 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी