DIY Beetroot Cream: घरच्या घरी बनवा 'बीट'ची फेस क्रीम 

लाइफफंडा
Updated Jan 20, 2020 | 16:00 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Homemade Face Cream: बीटच्या मदतीनं आपण स्वत: साठी क्रीम बनवू शकता. ही क्रीम लावल्यानं तुमची त्वचेला एक गुलाबी चमक मिळेल. 

Beetroot Cream
DIY Beetroot Cream: घरच्या घरी बनवा 'बीट'ची फेस क्रीम   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: हिवाळ्यात आपण आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक गोष्टी वापरल्यास तुम्हाला तुमची त्वचा नेहमीच कोमल दिसेल.  हिवाळ्यात स्किन केअर सोपं नसतं. यासाठी या कामात तुमची मदत करण्यासाठी एक खास भाजी कामी येईल, जे आहे बीट.  बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्ही नक्कीच ऐकले असतील पण तुम्हाला हे माहित आहे की चेहऱ्यावर हे लावल्यानं त्वचा ग्लो करते. बीट खाल्ल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. बीटमध्ये पचनक्रिया वाढविण्यासाठी मदत करणारे खनिजे आणि पोषक तत्त्वे असतात. १०० ग्रॅम बीटमध्ये ४३ कॅलरीज असतात. 

याच्या मदतीने आपण एक खास क्रीम बनवू शकता जी हिवाळ्यात आपली त्वचा चांगली ठेवेल. बीटरूटची क्रिम लावल्यास तुमच्या त्वचेवर एक वेगळाच चमकदार ग्लो दिसतो. ही क्रीम नाइट क्रीम म्हणून वापरू शकता. जाणून घेऊया ही क्रीम बनवण्याची पद्धत. 

कृती 

  • सोललेलं बीट - 1 
  • एलोवेरा जेल- 2 चमचे
  • व्हिटामिन ई कॅप्सूल- 1 
  • बदामाचे तेल- 1/2 चमचे

बीटरूटची क्रीम बनवण्याची कृती 

  • बीटरूट सोलून बारीक करा. त्याचा रस काढून टाका आणि त्याचा लगदा वेगळा करा. 
  • एका भांड्यात दोन चमचा एलोवेरा जेल, बदामाचे तेल आणि व्हिटामिन ई कॅप्सूल टाकून चांगलं मिसळून घ्या. 
  • हे मिश्रण सफेद होईपर्यंत फेटत रहा
  • त्यानंतर या 4-5 चमचे बीटरूटचा रस मिसळा.
  • एका छोट्या डब्ब्यात हे मिश्रण भरून फ्रीझरमध्ये ठेवा.

ही क्रीम 15 दिवसांसाठी एका एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा. ही क्रीम लावण्याआधी पहिल्यांदा एका पॅचवर टेस्ट करा. जर आपल्याला असे वाटत असेल की त्याचा रंग बराच गडद असेल तर तो संतुलित करण्यासाठी एलोवेरा जेल मिसळा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...