Vastu Tips In Marathi | मुंबई : वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी आणि लावण्यासाठी काही नियम आणि त्याचे काही फायदे आहेत. काही गोष्टी लक्षात ठेवून घरामध्ये कोणत्याही वस्तूचा वापर केल्यास त्याचे शुभ आणि फलदायी लाभ होतात तसेच घरात सकारात्मकता नांदते. त्याचप्रमाणे घराच्या भिंतींवर घड्याळे लावण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. (Do not accidentally set the clock in this direction in the house).
अधिक वाचा : माता लक्ष्मी घरी येण्याआधी देते हे संकेत, वाचा सविस्तर
दरम्यान, आपल्या सर्वांच्या घरी घड्याळे असतात. घरांमध्ये आपण अनेकदा घड्याळ अशा ठिकाणी लावतो अथवा ठेवतो जिथून आपण ते सहज पाहू शकतो. पण हे करत असताना आपण घड्याळाच्या काट्याकडे थोडेही लक्ष देत नाही. खर तर वास्तुशास्त्रानुसार घरात सुख, शांती आणि समृद्धीसाठी घड्याळ योग्य दिशेने असणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला लावलेले घड्याळ केवळ आरोग्यच खराब करत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील आणते. घरातील लोकांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होतो.
घराच्या भिंतीवरील घड्याळ केवळ वेळच सांगत नाही तर अनेक शुभ आणि अशुभ संकेतही देते. वास्तू नियमांनुसार घड्याळाचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास तेही नुकसानीचे कारण बनते. घड्याळाचा जीवनावर परिणाम होतो. घरातील बंद पडलेले घड्याळ नकारात्मकता पसरवते. त्याचबरोबर घरही घड्याळासारखे निर्जीव अर्थात बंद पडल्यासारखे होते.
त्यामुळे आज आपण घराच्या भिंतींवर घड्याळ लावण्याच्या वास्तुशास्त्राच्या नियमांबद्दल भाष्य करणाप आहोत. इथे आपण पाहणार आहोत की घरामध्ये घड्याळ कोणत्या दिशेला आणि कसे ठेवावे जेणेकरून घरात सकारात्मकता राहते आणि सुख, शांती आणि समृद्धी येते.
अधिक वाचा : जुळे असल्याचा घेतला गैरफायदा, भावाच्या बायकोवर बलात्कार