सुखी वैवाहिक जीवनासाठी Bedroom मध्ये चुकूनही ठेवून नका 'या' वस्तू; तुमच्याही खोलीत असतील आत्ताच काढा बाहेर

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Sep 10, 2021 | 11:46 IST

घर घेताना किंवा घर बांधतांना आपण वास्तूशास्त्र पाहत असतो. घरातील खोल्या योग्य दिशेला आहेत का नाही याची तपासणी करत असतो. परंतु सुखी जीवनासाठी फक्त योग्य दिशेला खोल्या असणं गरजेचं नाही.

Do not place 'these' items in the Bedroom for a happy married life
सुखी वैवाहिक जीवनासाठी Bedroom मध्ये ठेवून नका 'या' वस्तू  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • बेडरुममध्ये अनुकूल वस्तू ठेवल्यास पती-पत्नीमध्ये वाद होत असतात.
  • देवी-देवतांचे फोटो बेडरुममध्ये ठेवू नका.
  • वास्तुशास्त्रानुसार बेडरुममध्ये झाडू किंवा कचरापेटी ठेवल्यास नवरा-बायकोमध्ये दुरावा निर्माण होत असतो.

नवी दिल्ली : घर घेताना किंवा घर बांधतांना आपण वास्तूशास्त्र पाहत असतो. घरातील खोल्या योग्य दिशेला आहेत का नाही याची तपासणी करत असतो. परंतु सुखी जीवनासाठी फक्त योग्य दिशेला खोल्या असणं गरजेचं नाही. खोलींमधील वस्तूही आपल्या जीवनात सकारात्मकता आणि नकारात्मकता आणत असतात. आपल्या घरातील अशीच एक खोली असते ती म्हणजे, बेडरुम. दिवसभरातील थकवा दूर करण्यासाठी बेडरुमचं आपल्याला शांतता देत असते. नवीन लग्न झालेल्यांसाठी बेडरुम ही  वैयक्तिगत जीवनासाठी महत्त्वाचे आहे. 

नकळतपणे होतात चुका 

विवाहित जोडप्यासाठी बेडरुम ही महत्त्वाची बाब असते. सुखी संसाराची स्वप्ने तेथूनच पाहिली जातात. परंतु नवविवाहित जोडप्याकडून नकळतपणे काही चुका होत असतात. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वास्तूशास्त्रानुसार जर बेडरुममध्ये अशी एखादी वस्तू असेल जी वास्तू्साठी अनुकूल नसेल तर पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असतो. यामुळे बेडरुममध्ये असलेल्या वस्तू बाहेर काढणं आवश्यक असतात.

बेडरुममध्ये ठेवू नका धार्मिक पुस्तके

ज्योतिषानुसार, बेडरुमला शुक्राचं स्थान मानलं जातं. म्हणून तेथे देवी-देवतांचे फोटो किंवा धार्मिक गुरूचे फोटो ठेवता कामा नये. यासोबत बेडरुममध्ये हनुमान चालिसा किंवा इतर धार्मिक ग्रंथ ठेवू नये.

बेडरुममधील कचरापेटी आणि झाडू बाहेर ठेवा

वास्तुशास्त्रानुसार बेडरुममध्ये कधीच झाडू म्हणजेच केरसुणी किंवा कचरापेटी ठेवू नये. मानलं जातं की, या गोष्टी बेडरुममध्ये ठेवल्याने नकारात्मकता ऊर्जा पसरत असते. आमि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असतो. बेडरुममध्ये केरसुणी किंवा कचरापेटी असल्यास मानसिक त्रास होत असतो.

बेडरुममध्ये ठेवू नका शोपीस आणि ताजमहलची प्रतिमा

बेडरुममध्ये कोणताच शोपीस ठेवू नये. ताजमहल आपण प्रेमाची निशाणी म्हणत असतो, पण मुळात ते एक कबर आहे. त्यामुळे बेडरुममध्ये ताजमहलची प्रतिमा किंवा शोपीस ठेवू नका. या गोष्टी ठेवल्यानं नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होत असते. 

काळ्या रंगाची चादर नका अथरु 

बेडरुमध्ये कधीच काळ्या रंगाची चादर अथरू नका.  मान्यतानुसार, काळा रंग हा अशुभतेचं संकेत देत असतो. जर काळी चादर टाकल्यास शुक्र आणि शनीचा मेळ घडून येत असतो. यामुळे नवरा-बायकोमधील वाद विकोपाला जात असतात. यामुळे दुसऱ्या रंगाची चादराचा उपयोग केला पाहिजे. 

बेडरुममध्ये काटेरी रोपटे ठेवू नका 

बेडरुममध्ये काटेरी रोपटे ठेवू नये. जर काटेरी रोपटे आपल्या बेडरुममध्ये असेल तर त्यातून नकारात्मकता येत असते. बेडरुममध्ये काटेरी रोपटे ठेवणं वैवाहिक जीवनासाठी अशुभ मानलं जातं. नवरा-बायकोमध्ये भांडण होत असतात आणि कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होत असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी