Lifestyle | मुंबई : सनातन धर्म आणि वास्तुशास्त्रात तुळशीला अत्यंत पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशीला विष्णुप्रिया म्हणतात तसेच घरात तुळशीचे रोप लावल्याने सौभाग्य प्राप्त होते. तुळशीच्या पूजेने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी स्वतः प्रसन्न होतात आणि ज्या घरांमध्ये तुळशीच्या रोपाची काळजी आणि त्याची निगा राखली जाते त्या घरांमध्ये त्याचा वास असतो. (Do not place these seedlings next to the basil tree can cause major damage).
अधिक वाचा : सोमय्या पित्रापुत्रांवर गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांकडून चौकशी
मात्र तुळशीच्या लागवडीसोबतच तुळशीच्या रोपाशी संबंधित काही बाबींची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा फायद्याऐवजी नुकसान अधिक होऊ शकते. चला तर म जाणून घेऊया तुळशीच्या रोपाचे काही नियम जे लक्षात ठेवले पाहिजेत.
तुळशीचे रोप नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. ते लावताना दिशेची काळजी घेतली पाहिजे कारण चुकीच्या दिशेला लावलेल्या तुळशीचे रोप संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा पसरवते. त्यामुळे शारीरिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागते. साहजिकच तुमच्या लक्षात आले असेल की अनेकदा घरातील स्त्रिया अंघोळीनंतर ओली केस असतानाच तुळशीला पाणी घालू लागतात. हे चुकीचे आहे. तुळशीला विष्णूची लाडकी वनस्पती मानली गेली आहे आणि अशा स्थितीत सौभाग्य वाढवण्यासाठी, उघडे केस सुकवून आणि बांधूनच तुळशीला पाणी अर्पण करावे.
अधिक वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्यांना चपलेने मारावे - संजय राऊत
तुळशीच्या आजूबाजूला साहित्य, चपला, झाडू किंवा कचरा ठेवू नये. गेटच्या बाहेर किंवा लोकांच्या पायाखाली तुळशचे रोप येणार नाही याची काळजी घ्यावी. एवढेच नाही तर तुळशीवर घाण पाणी पडू नये याचीही काळजी घेतली पाहिजे. ज्या कुंडीत तुळशीचे रोप लावले आहे तेथे दुसरे कोणतेही रोप लावू नये.
तुळशीभोवती काटे असलेली झाडे लावू नयेत. यामुळे घरामध्ये दुर्दशा वाढते आणि तुळशीच्या पूजेचे योग्य फळ मिळत नाही. दुधात पाणी मिसळून तुळशीला अर्पण करावे. यामुळे तुळस हिरवी राहते आणि तिची वेगाने वाढ होते. रविवारच्या दिवशीला तुळशीला जल अर्पण करू नये. अनेकदा संध्याकाळी तुळशीखाली दिवा लावला जातो. परंतु दिवा लावल्यानंतर तो विझल्यावर तुळशीच्या रोपापासून हटवण्याची काळजी घेतली पाहिजे. तुळशीचे रोप नेहमी अंगणात लावावे. अंगण नसेल तर घराच्या खिडकीपाशी हे रोप लावता येते. पण ते छतावर ठेवू नये.