Chanakya Niti: आयुष्यात या चार लोकांशी चुकूनही करू नका भांडण, आयुष्यभर होईल पश्चाताप 

लाइफफंडा
Updated May 07, 2022 | 14:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chanakya Niti in marathi | आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात राजकारण आणि आर्थिक विषयांसोबत जीवनाशी संबंधित समस्यांचे निराकरणही सांगितले आहे. प्रत्येक व्यक्तीची त्यांच्या धोरणांबाबत वेगवेगळी विचारसरणी आणि पैलू असतात.

Do not quarrel with these four people by mistake in life
आयुष्यात या चार लोकांशी चुकूनही करू नका भांडण, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनाशी संबंधित समस्यांचे निराकरणही सांगितले आहे.
  • आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आधार त्याचे कुटुंबीय असतात.
  • मूर्ख माणसाशी कधीही वाद घालू नये.

Chanakya Niti in marathi | मुंबई : आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात राजकारण आणि आर्थिक विषयांसोबत जीवनाशी संबंधित समस्यांचे निराकरणही सांगितले आहे. प्रत्येक व्यक्तीचे त्यांच्या धोरणांबाबत वेगवेगळी विचारसरणी आणि पैलू असतात. आचार्य चाणक्यांची धोरणे जीवनाचे सत्य सांगतात, म्हणून ती लोकांना कठोर वाटतात. त्यांनी सांगितलेले उपाय तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत मदत करतील. आचार्य चाणक्यांच्या नीतिशास्त्रात सांगितलेले एक धोरण नातेवाईकांसाठी आहे. चाणक्याच्या मते, नातेवाईक, मित्र, मूर्ख लोक आणि गुरु यांच्याशी कधीही भांडण करू नये. (Do not quarrel with these four people by mistake in life). 

अधिक वाचा : या भारतीय कंपनीत अर्धा तास झोप घेऊ शकतात कर्मचारी 

नातेवाईक असतात जीवनाचा आधार 

आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आधार त्याचे कुटुंबीय असतात. त्यामुळे त्यांच्याशी वाद झाला तर त्या व्यक्तीला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यच आपल्या चांगल्या-वाईट वेळेचे सोबती असतात. अशा परिस्थितीत त्यांच्याशी भांडण केल्यानंतर आपण योग्य आणि चुकीचा फरक करू शकणार नाही.

जगात सर्वात मोठी असते मैत्री 

आचार्य चाणक्य म्हणतात की, जगात मैत्री ही सर्वात मोठी गोष्ट आहे, खरा मित्र तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देतो आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक समस्येला सामोरे जाण्यासाठी आधार देत असतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मित्राशी भांडण केले तर तो विश्वासू नाते गमावेल. याचा त्याला आयुष्यभर पश्चाताप होईल.

गुरू करतात मार्गदर्शन 

आचार्य चाणक्य यांची नीती सांगते की, गुरु हाच आपल्याला मार्गदर्शन करतो. गुरु आपल्याला जीवनातील चांगल्या आणि वाईटाचे ज्ञान देतात आणि आपल्याला योग्य मार्ग निवडण्यास मदत करतात. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या गुरूशी वाद घातला तर तो गुरूंच्या कृपेपासून दूर राहतो. असे झाल्यास त्याला प्रबोधन आणि मार्गदर्शन करणारे कोणीही नसेल.

मूर्ख व्यक्तीशी वाद करू नका

आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, मूर्ख माणसाशी कधीही वाद घालू नये. असे केल्यास तुमचा वेळ वाया घालवण्यासोबतच तुमची शांतताही दूर निघून जाते. अशा माणसाला समजावून सांगणे म्हणजे गाढवाला गुळाची चव सांगणे होय. यासोबतच त्याचा तुमच्या वैयक्तिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी