Makar Sankranti : मकर संक्रांतीच्या दिवशी जरूर करा या ४ गोष्टी, प्रत्येक कामात मिळेल यश

लाइफफंडा
Updated Jan 10, 2022 | 12:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Makar Sankranti 2022 | नवीन वर्षातील जानेवारी महिना उजाडला की सर्वांना आतुरता असते ती म्हणजे नव्या वर्षातील पहिल्या सणाची (First Festival) अर्थात मकर सक्रांतीची. तिळगुळाप्रमाणेच गोड असलेल्या या सणाचे खूप महत्त्व आहे.

Do these 4 things on Makar Sankranti festival You will get success in every work
मकर संक्रांतीच्या दिवशी जरूर करा या ४ गोष्टी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • आचार्य इंदू प्रकाश यांच्या मते, एका वर्षात एकूण बारा संक्रांती असतात त्यापैकी सूर्याची मकर संक्रांती आणि कर्क संक्रांती खूप खास असतात.
  • प्रत्येक संक्रांतीच्या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान आणि दान करण्याचे खूप महत्त्व आहे.
  • मकर सक्रातींच्या या पवित्र दिवशी एखाद्या व्यक्तीने ब्राह्मण गृहस्थाला अन्न किंवा अन्नपदार्थ असलेली तीन भांडी द्यावी आणि शक्य असल्यास यम, रुद्र आणि धर्माच्या नावाने गाय देखील दान करावी.

Makar Sankranti 2022 | नवी दिल्ली : नवीन वर्षातील जानेवारी महिना उजाडला की सर्वांना आतुरता असते ती म्हणजे नव्या वर्षातील पहिल्या सणाची (First Festival) अर्थात मकर सक्रांतीची. तिळगुळाप्रमाणेच गोड असलेल्या या सणाचे खूप महत्त्व आहे. आचार्य इंदू प्रकाश यांच्या मते, एका वर्षात एकूण बारा संक्रांती असतात त्यापैकी सूर्याची मकर संक्रांती आणि कर्क संक्रांती खूप खास असतात. या दोन्ही संक्रांतीवर सूर्याच्या गतीमध्ये बदल होतो. जेव्हा सूर्य कर्क संक्रांतीत असतो तेव्हा सूर्य उत्तरायणातून दक्षिणायनाकडे जातो आणि जेव्हा सूर्य मकर संक्रांतीला असतो तेव्हा सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात जातो. दरम्यान यंदाचा मकर संक्रांतीचा सण १४ जानेवारी २०२२ ला शुक्रवारी साजरा केला जाणार आहे. (Do these 4 things on Makar Sankranti festival You will get success in every work). 

दरम्यान, मकर संक्रांतीचा सण म्हणजे सूर्योदयाचा उत्सव. त्यामुळे काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायणी असेही म्हणतात. आचार्य इंदू प्रकाश यांच्या म्हणण्यानुसार मकर संक्रांतीचा दिवस दानधर्मासाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी काही काम केल्याने अनेक पटींनी अनेक प्रकारे जास्त फळ मिळू शकते. अशी अनेक कामे मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मानली जातात.

पवित्र नदीत करा स्नान  

प्रत्येक संक्रांतीच्या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान आणि दान करण्याचे खूप महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे, परंतु जर तेथे प्रत्यक्ष जाता येत नसेल तर या दिवशी घरी साध्या पाण्याने स्नान करावे आणि शक्य असल्यास त्या पाण्यात थोडे पवित्र नदीचे पाणी मिसळावे. असे केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते आणि पैशाची देखील कमतरता भासत नाही.

पाण्यात तिळाचे तेल टाकून अंघोळ करावी

संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजेच त्या पवित्र सणाच्या आदल्या दिवशी माणसाने दिवसांतून दुपारी एकदाच जेवण करावे आणि संक्रांतीच्या दिवशी दात साफ केल्यानंतर पाण्यात तीळ मिसळून अंघोळ करावी किंवा तिळाचे तेल किंवा तिळ लावावे. असे बोलले जाते. लक्षणीय बाब म्हणजे संक्रांतीच्या दिवशी दान, दक्षिणा किंवा धार्मिक कार्याचे शंभरपट अधिक फळ मिळते. असेही म्हटले जाते. 
माघे मासे महादेव: यो दास्यति घृतकम्बलम।
स भुक्त्वा सकलान भोगान अन्ते मोक्षं प्राप्यति॥

दानधर्म जरूर करा

मकर सक्रातींच्या या पवित्र दिवशी एखाद्या व्यक्तीने ब्राह्मण गृहस्थाला अन्न किंवा अन्नपदार्थ असलेली तीन भांडी द्यावी आणि शक्य असल्यास यम, रुद्र आणि धर्माच्या नावाने गाय देखील दान करावी. तर जर एखाद्याला या सर्व गोष्टी दान करायच्या नसतील तर त्याने फक्त फळांचे दान करावे. परंतु त्या व्यक्तीने काहीतरी दान केले पाहिजे. यासोबतच खालील श्लोकाचे देखील जरूर वाचन करावे. 

‘यथा भेदं न पश्यामि शिवविष्णवर्कपद्मजान्।
तथा ममास्तु विश्वात्मा शंकरः शंकरः सदा।।‘

या श्लोकाचा अर्थ असा की, मी शिव, विष्णू, सूर्य आणि ब्रह्मा यांच्यात भेदभाव करत नाही. सर्व विश्वव्यापी आत्मा असलेल्या शंकराचे सदैव कल्याण होवो.

तेल नसलेले अन्न खावे

मकर संक्रांतीला खिचडीच्या नावाने देखील संबोधले जाते. या सणाच्या दिवशी उडीद डाळ आणि तांदूळ यांचे दान केले जाते. तसेच तीळ, पक्षी, सोने, लोकरीचे कपडे, ब्लँकेट इत्यादी दान करणेही महत्त्वाचे आहे. मात्र दान केल्यावर तेल नसलेले अन्न खावे आणि शक्यतो इतर लोकांना अन्नदान करावे. शास्त्रानुसार घरातील सुनेने संक्रांती, कृष्ण एकादशी आणि चंद्र व सूर्यग्रहण या दिवशी कोणतेही व्रत करू नये.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी