Rat Home Remedies: घरातील उंदीर पळून जातील, हा सोपा घरगुती उपाय एकदा वापरून पाहा...

Rat Control : बहुतेकांच्या घरात उंदरांचा उपद्रव असतो. उंदीर घरी न बोलावलेले पाहुणे म्हणून येतात. घरातील अन्न चोरण्यापासून ते खराब करणे आणि इकडे तिकडे घाण पसरवणे ही सर्व कामे हे उंदीर (Rat) करतात. स्वयंपाकघरातील सामान काढल्याबरोबर उंदीर लगेचच पायावर लोळण घेत पळून जातो तेव्हा तर सर्वच मर्यादा गाठलेली असते. मात्र उंदरांच्या शिताफीपुढे आणि चपळाईपुढे आपले काही चालत नाही. अशावेळी साधे घरगुती उपाय खूप परिणामकारक ठरतात.

Rat Control
उंदरांना आवर घालण्यासाठीचे घरगुती उपाय 
थोडं पण कामाचं
  • अशा प्रकारे सर्व उंदीर पळून जातील.
  • या गोष्टींच्या वासाने उंदरांना त्रास होतो.
  • या वासाने उंदीर गुदमरतील.

Rat Home Remedies : नवी दिल्ली : बहुतेकांच्या घरात उंदरांचा उपद्रव असतो. उंदीर घरी न बोलावलेले पाहुणे म्हणून येतात. घरातील अन्न चोरण्यापासून ते खराब करणे आणि इकडे तिकडे घाण पसरवणे ही सर्व कामे हे उंदीर (Rat) करतात. स्वयंपाकघरातील सामान काढल्याबरोबर उंदीर लगेचच पायावर लोळण घेत पळून जातो तेव्हा तर सर्वच मर्यादा गाठलेली असते. मात्र उंदरांच्या शिताफीपुढे आणि चपळाईपुढे आपले काही चालत नाही. अशावेळी साधे घरगुती उपाय खूप परिणामकारक ठरतात. तुमच्याबरोबरदेखील असेच घडत असेल तर तुम्ही या उंदरांपासून सुटका करण्याचे उपाय शोधत असाल. चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया काही सोप्या घरगुती उपायांनी (Home remedies for Rat) या उंदरांना घराबाहेर कसे काढायचे. (Do these home remedies for rat control, check details)

अधिक वाचा : Vastu Tips: घरात पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवा ही छोटी गोष्ट, कधीच भासणार नाही पैशाची कमतरता!

उंदरांपासून सुटका करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies To Get Rid Of Rats) -

कांदा
कांद्याच्या वासाने उंदीर चिडतात कारण ते त्यांच्यासाठी विषारी आहे. ज्या ठिकाणी उंदीर फिरतात तेथे कांदे सोलून ठेवू शकता. तथापि, जर तुमच्या घरात पाळीव प्राणी असेल तर ते त्याच्यासाठी देखील योग्य आहे असे सांगता येणार नाही. यासंदर्भात तुम्ही खातरजमा करून घेतली पाहिजे. म्हणून दररोज कांदा बदलत राहा जेणेकरून त्याचा वास फक्त उंदरांवरच परिणाम करेल.

लाल मिरची
या उंदीर आणि कीटकांपासून बचाव करण्यासाठी लाल मिरचीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. उंदीर जिथून येतात आणि जिथे त्यांचा लपंडाव असेल तिथे तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट शिंपडू शकता.

अधिक वाचा : Parenting Mistakes : पालकांच्या चुकांमुळे मुलांना लागते मोबाईलचे व्यसन, अशा प्रकारे सुटू शकते मोबाईलचे व्यसन...

लसूण
उंदीर मारण्यासाठी लसणापासून औषध तयार करणे सोपे आहे. बारीक चिरलेला लसूण पाण्यात मिसळा. लसणाच्या कळ्याही तुम्ही घरी ठेवू शकता.

लवंगा
उंदीर दूर करण्यासाठी लवंग किंवा लवंग तेल देखील वापरले जाऊ शकते. लवंगाच्या कळ्या मलमलच्या कपड्यात गुंडाळून इकडे तिकडे ठेवा. लवंगाचे तेलही अशाच प्रकारे वापरता येते.

पेपरमिंट
उंदरांना पेपरमिंटचा वास अजिबात सहन होत नाही. कापूस लोकरीमध्ये पेपरमिंट घाला आणि उंदीर ज्या ठिकाणी फिरतात तेथे सोडा. उंदीर स्वतः पळू लागतील.

अधिक वाचा : Parenting Tips: मुलाला जबरदस्तीने खाऊ घालणे ठरू शकते नुकसानीचे, हे आहेत दुष्परिणाम

अनेकवेळा पेस्ट कंट्रोल करून देखील उंदरांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात हे तुमच्या घरातील परिस्थिती, आजबाजूचा परिसर, स्वच्छता, सांडपाणी, गटारीची व्यवस्था इत्यादी अनेक बाबींवर अवलंबून आहे. मात्र घरात आणि आजबाजूच्या परिसरात जितकी जास्त स्वच्छता ठेवली जाईल तितकाच उंदरांचा उपद्रव कमी असेल किंवा टाळता येईल.

(डिस्क्लेमर : ही सामग्री, सल्ल्यासह, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी