Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय, होईल माता लक्ष्मीची कृपा; पडेल पैशांचा पाऊस

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Aug 29, 2022 | 16:28 IST

Vastu Tips For Money: अनेकांना मेहनत करूनही चांगले परिणाम मिळत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना अनेकदा आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. वास्तू दोष देखील या समस्यांचे कारण असू शकतात.

Vastu Tips
रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय 
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वास्तूला (Vastu) खूप महत्त्व आहे. वास्तूमध्ये काही गडबड झाल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होत असतो.
  • वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्या फॉलो केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
  • प्रत्येक व्यक्ती अत्यंत काळजीपूर्वक आणि आवडीने घर बांधतो. ते घर चांगल्या पद्धतीनं सजवतो देखील. मात्र या काळात तो अनेकदा वास्तूची काळजी घेत नाही.

मुंबई: Vastu Tips For Economic Crunch: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वास्तूला (Vastu) खूप महत्त्व आहे. वास्तूमध्ये काही गडबड झाल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होत असतो. त्यानंतर त्या व्यक्तीला आरोग्य, आर्थिक (financial problems)  या आणि अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी वास्तूशास्त्राचे असे काही टीप्स फॉलो केल्यानंतर आरोग्य चांगले राहतं तसंच आर्थिक समस्याही सुटतात. त्यातच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक इच्छा असते की त्याचे जीवन ऐशोआरामात जावे. यासाठी तो खूप मेहनतही करतो. मात्र अनेकांना मेहनत करूनही चांगले परिणाम मिळत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना अनेकदा आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. वास्तू दोष देखील या समस्यांचे कारण असू शकतात. अशा स्थितीत वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्या फॉलो केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सुख-समृद्धी वाढते. (Do this remedy before going to bed at night in home vastu tips in marathi)

झोपण्यापूर्वी करा हे उपाय

प्रत्येक व्यक्ती अत्यंत काळजीपूर्वक आणि आवडीने घर बांधतो. ते घर चांगल्या पद्धतीनं सजवतो देखील. मात्र या काळात तो अनेकदा वास्तूची काळजी घेत नाही. त्यामुळे घरात समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते. अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी घरी काही उपाय करून या समस्या पूर्णपणे दूर केल्या जाऊ शकतात.

अधिक वाचा-  Glowing Skin साठी हळद- लसणाचा फेस पॅक

किचनमध्ये बादली

रात्री झोपण्यापूर्वी पाण्याची बादली भरून किचनमध्ये ठेवा. असे केल्याने व्यक्तीला कर्जापासून मुक्ती मिळते आणि पैशांची समस्याही दूर होते. यासोबतच घराची आर्थिक स्थितीही मजबूत होण्यास सुरूवात होते. 

पाण्याने भरलेली बादली

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेली बादली कधीही रिकामी नसावी. बाथरुममध्ये भरलेल्या बादलीने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये पाण्याने भरलेली बादली ठेवा.

दिवा लावा

घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. यासोबतच मुख्य दरवाजावरही दिवा लावावा. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात देवीचा सहवास होतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी