Vastu shastra : नवी दिल्ली : या धावत्या जीवनात (Life) जेथे जागा मिळेल आणि मिळेल तशा जागेत घर बांधून अनेकजण आपल्य जबाबदारीतून मोकळं होत असतात. घर बांधत असताना वास्तुशास्त्राचा (Vastu shastra ) विचार केला गेला पाहिजे, परंतु कित्येकजण आपलं नवीन घर बांधताना वास्तुशास्त्राचा विचार करत नाहीत किंवा अनेकांना त्यावर विश्वास नसतो. मात्र, वास्तुशास्त्रानुसार (Vastu shastra) घर नसेल तर विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
ज्यामध्ये पैशांची उधळपट्टी होऊ लागते आणि विनाकारण पैसे वाया जाऊ लागतात. या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घर बांधताना वास्तू जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा. पण अनेकवेळा लाख प्रयत्नांनंतरही पैशांशी संबंधित एक ना अनेक समस्या लोकांना सतावत राहत असते. यासाठी वास्तुशास्त्रात वर्ज्य मानल्या गेलेल्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, घरातील एखादी वस्तू चुकीच्या दिशेने आणि चुकीच्या स्थितीत ठेवल्याने देखील अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. पैसे हरवणे, अडकणे आणि चोरी होण्यापासून वाचवणे यासाठी वास्तुशास्त्रात कोणते उपाय सांगितले आहेत ते जाणून घेणं गरजेचं असत. आज आपण या लेखातून त्याच विषयी जाणून घेणार आहोत..
तुम्ही जर एखादे नवीन घर घेतले आहे किंवा बांधले आहे आणि तिथे राहायला गेल्यानंतर सतत पैशांची हानी होत आहे. तर एखादा वास्तुदोष असू शकतो. यावर उपाय म्हणून घराच्या एका कोपऱ्यात तुरटीचा तुकडा ठेवू शकता. पण, लक्षात ठेवा की तुरटी अशा ठिकाणी ठेवावी जिथे ती कोणाला दिसणार नाही. असे केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष संपून तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल.
वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की, जर तुमच्या घराचे दरवाजे तुटलेले असतील, उघडताना आणि बंद करताना त्यामध्ये आवाज होत असेल किंवा दरवाजा उघडताना आणि बंद करताना अडकत असेल तर या तिन्ही परिस्थितीत तुमचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे तुमची धन हानी होऊ शकते. तुमच्या घराच्या दाराच्या अशा काही समस्या असल्यास लवकरात लवकर त्याचे निराकरण करा.
अनेकदा आपण घरातील छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण त्या गोष्टी आपल्या घरात अपशकून घेऊन येत असतात. जर तुमच्या घराच्या छतावरील टाकीतून पाणी किंवा घरातील खराब नळातून पाणी टपकत असेल तर हे वास्तुशास्त्रानुसार अजिबात चांगले नाही. वास्तूशास्त्रानुसार असे मानले जाते की, सतत पाणी वाहत असल्याने घराचे उत्पन्नही पाण्यासारखे वाहू लागते. घर बांधताना हेही लक्षात ठेवावे की पाण्याचा निचरा घरामध्ये नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावा.
घरातील गॅस किंवा स्टोव्हवर नेहमी भांडी ठेवू नयेत, यामुळे आई अन्नपूर्णेचा अपमान होतो, असे वास्तू तज्ञांचेही मत आहे. अनेक महिला जेवण बनवल्यानंतर भांडी गॅसवर तशीच ठेवत असतात. जर तुम्ही तसेच करत असाल तर ती सवय आत्ताच बदला.