Rangpanchami : रंगपंचमी या सणाविषयी हे माहिती आहे का?

Do you know about Rangpanchami festival? : हिंदू पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी साजरी करतात. यंदा रविवार 12 मार्च 2023 रोजी रंगपंचमी आहे.

Rangpanchami
रंगपंचमी या सणाविषयी हे माहिती आहे का?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Rangpanchami : रंगपंचमी या सणाविषयी हे माहिती आहे का?
  • यंदा रविवार 12 मार्च 2023 रोजी रंगपंचमी
  • रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण

Do you know about Rangpanchami festival? : हिंदू पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी साजरी करतात. यंदा रविवार 12 मार्च 2023 रोजी रंगपंचमी आहे. धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. या पाचव्या दिवशी रंग खेळून सण साजरा करतात. याच कारणामुळे या सणाला रंगपंचमी असे म्हणतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून सण साजरा करतात, आनंदोत्सव करतात. 

द्वापारयुगात कृष्ण बालगोपाळांसह रंगपंचमी साजरी करत होता. या निमित्ताने एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून उन्हाची तलखी कमी केली जात होती. मध्ययुगात संस्थानिक, राजे हे होळी आणि रंगपंचमी हे दोन सण साजरे करू लागले. रंगपंचमीच्या दिवशीच राधा आणि कृष्ण यांनी एकमेकांसोबत रंग खेळून आनंद साजरा केला असे सांगतात. याच कारणामुळे काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी राधा आणि कृष्ण यांची पूजा केली जाते.

  1. रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा त्रास कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून हा सण साजरा करण्याची पद्धत आहे.     
  2. रंगपंचमी या दिवशी पुरणपोळी खातात. थंडाई पितात. काही जण भांग पितात. 
  3. रंगपंचमी हा सण एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून तसेच एकमेकांना वेगवेगळे रंग लावून अर्थात रंगांचा खेळ खेळून साजरा करतात. रंगपंचमीच्या दिवशी रंगांचा खेळ खेळतात. 
  4. उत्तर प्रदेशमध्ये मथुरेत रंगपंचमीच्या सणाला धार्मिक महत्त्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी अर्थात वसंत पंचमीच्या दिवशी कृष्ण, बलराम यांच्या मंदिरात उत्सव साजरा होतो. तसेच लोकगीते गाण्याचे कार्यक्रम होतात. 
  5. हरयाणा, मध्य प्रदेश या ठिकाणीही कृष्ण, शंकर, पार्वती यांच्या मंदिरात जाऊन उत्सव साजरा करतात. या मंदिरांमध्येही लोकगीते गाण्याचे कार्यक्रम होतात.

शनिकृपेसाठी शनिवारी खा हे पदार्थ

या गावात कुंभकर्णासारखी कुठेही कितीही तास झोपतात माणसं

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी