kunku: कुंकू हे एक सौभाग्यचिन्ह आणि सौंदर्य प्रसाधनाचे (Cosmetics) साधन म्हणूनही वापरले जाते. सुहासिनी महिला (women)कपाळाला सौभ्याग्याची ओळख म्हणून कुंकू लावत असतात. प्राचीन काळापासून या कुंकवाला (kunku) अनन्य साधारण महत्व आहे. आता संक्रांतीचा सण येत आहे, देशभरामध्ये हा सण साजरा केला जातो. हा सण मुख्यतः हळदी-कुंकवाचा सण म्हणून सगळीकडे ओळखला जातो. या सणाला महिला एकमेंकांना कुंकू लावत असतात, पण कुंकू आपल्या घरी येतं कुठून याची कल्पना बहुतेकांना नाहीये. (do you know where the sindoor came from to your home?)
अधिक वाचा : भारताने T20 सीरिज जिंकली, पहिली वन डे मंगळवारी
दरम्यान, उत्तर भारतातील हिंदू महिला आपल्या भांगमध्ये सिंदूर लावत असतात. हा सिंदूर कुंकूपासून बनवण्यात येतो. परंतु हा कुंकू नेमका येतो कुठून हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आम्ही देत आहोत.. या कुंकवाचे एक झाड असते, त्यातून कुंकू आपल्या घरात येत असते. या झाडाला इंग्रजीमध्ये kumkum Tree किंवा kamila Tree म्हणतात. इतर वनस्पतींप्रमाणे सिंदूर कूंकवाचे हे देखील एक झाड आहे. ही अशी वनस्पती आहे जिच्यापासून निघणाऱ्या फळ्यांपासून पावडर आणि द्रव मिसळून सिंदूरसारखा लाल रंग तयार करतात. बरेच लोक याला लिक्विड लिपस्टिक ट्री असेही म्हणतात, कारण त्यातून निघणारा रंग तुमच्या ओठांना नैसर्गिकरित्या रंग देत असतो. चला तर जाणून घेऊया सिंदूरच्या झाडाविषयी.
अधिक वाचा : 10 जानेवारीला अंगारकी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या महत्त्व
सिंदूर वनस्पती दक्षिण अमेरिका आणि काही आशियाई देशांमध्ये उगवले जातात. तर भारतात ही वनस्पती फक्त महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील काही निवडक भागात लावली जातात. या झाडाची उंची 20 ते 25 फूट असते. परंतु सिंदूरचे हे झाड सहजासहजी दिसत नाही, परंतु या झाडाच्या एका फळापासून एक किंवा दीड किलोपर्यंतचं सिंदूर मिळत असते. त्याची किंमत प्रति किलो ₹ 400 पेक्षा जास्त आहे.
सिंदूर हे झाडाच्या फळातून निघणाऱ्या बिया बारीक करून बनवले जाते. शिवाय हे पूर्णपणे नैसर्गिक असल्याने याचे कोणतेही नुकसान होत नाही. झाडाची फळे गुच्छांमध्ये वाढतात, जी सुरुवातीला हिरवी असतात, परंतु नंतर हे फळ लाल रंगात बदलते, त्या फळांमध्ये सिंदूर असतो. तो सिंदूर लहान दाण्यांच्या आकारात असते, जे इतर कोणत्याही गोष्टी न मिसळता दळून थेट वापरता येते. हे शुद्ध असून आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. हा सिंदूर केवळ कपाळावर लावण्यासाठी वापरला जात नाही, तर त्याचा वापर खाद्यपदार्थांना लाल रंग देण्यासाठीही केला जातो. म्हणजेच ते खाल्लेदेखील जाते.
कुमकूम ट्रीपासून काढलेल्या सुंदूरपासून उच्च दर्जाची लिपस्टिक बनवण्यासाठी केला जातो. तसेच यापासून औषधेही बनवली जातात. लिपस्टिक, हेअर डाय नेल पॉलिश अशा अनेक गोष्टींमध्ये याचा वापर होत असतो. लाल शाई बनवणे, रंगासाठी वापरणे, साबणासाठी वापरणे यांचा समावेश होतो. जिथे लाल रंग वापरता येतो तिथे ही वनस्पती वापरली जाते.
हे सिंदूर किंवा कुंकूचे झाडा लावण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे बिया जमिनीत पेरुन तर दुसरा मार्ग म्हणजे रोप तयार केल्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी हे झाड लावावे. सिंदूर रोप घरी सहज वाढू शकत नाही, कारण त्याला वेगळ्या हवामानाची आवश्यकता असते. यासोबत एक गोष्ट अशी आहे की जर तुम्ही या रोपाला जास्त पाणी किंवा खत दिले तर ही रोप मरते आणि कमी दिली तर फळे येत नाहीत.