Dream Science: तुम्हालाही स्वप्नात मृत पूर्वज दिसतात? जाणून घ्या याचा नेमका अर्थ काय आहे

लाइफफंडा
Updated Jun 09, 2022 | 10:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dream Science । झोपेत येणाऱ्या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असतो याबाबत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. अशी स्वप्ने भविष्याबद्दल सूचित करतात आणि सांगतात की जीवनात शुभ किंवा अशुभ होणार आहे असा अनेकांचा समज आहे.

Do you see dead ancestors in a dream, Find out exactly what this means
तुम्हालाही स्वप्नात मृत पूर्वज दिसतात? जाणून घ्या याचे कारण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • झोपेत येणाऱ्या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असतो याबाबत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे.
  • काही जणांची तक्रार असते की त्यांनी स्वप्नात तिसरा डोळा पाहिला आहे.
  • स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी अनेक प्रकारचे संकेत देतात.

Dream Science । मुंबई : झोपेत येणाऱ्या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असतो याबाबत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. अशी स्वप्ने भविष्याबद्दल सूचित करतात आणि सांगतात की जीवनात शुभ किंवा अशुभ होणार आहे असा अनेकांचा समज आहे. चला तर म जाणून घेऊया मृत पूर्वज स्वप्नात पुन्हा पुन्हा येण्याचा नेमका अर्थ काय आहे. (Do you see dead ancestors in a dream, Find out exactly what this means). 

अधिक वाचा : गरमीमध्ये अशा प्रकारे सहज कमी करा वजन, फॉलो करा या टिप्स

मृत पूर्वज स्वप्नात येण्याचे संकेत काय आहेत?

अनेकजण असा प्रश्न करतात की मृत पूर्वज आपल्या स्वप्नात पुन्हा पुन्हा येतात. याचे संकेत काय आहेत? यावर आचार्य विक्रमादित्य म्हणतात की मृत पूर्वजांना स्वप्नात वारंवार पाहणे म्हणजे तुम्ही त्यांना विसरलात असा त्याचा अर्थ होतो. तुमच्याकडून कोणतीतरी मोठी चूक झाली आहे. तसेच त्यांना स्वप्नातून तुम्हाला काहीतरी सांगायचे असते. 

लक्षणीय बाब म्हणजे समजले नाही तर त्याची पुढची पायरी काही वेगळी असू शकते. जे तुमचे नुकसान देखील करू शकतात. हे टाळण्यासाठी अमावस्येच्या दिवशी नदीच्या काठावर पूर्वजांच्या नावाने दिवा लावा आणि एखाद्या गरीब व्यक्तीला कापड दान करा.

स्वप्नात तिसरा डोळा दिसण्याचा अर्थ काय आहे?

काही जणांची तक्रार असते की त्यांनी स्वप्नात तिसरा डोळा पाहिला आहे. याचे संकेत काय असतात? असा प्रश्न सर्वांच्याच मनात येतो. यावर आचार्य म्हणतात की भगवान शंकराचा तिसरा डोळा स्वप्नात पाहणे शुभ नाही. हे असे संकेत देते की, आगामी काळात तुमच्या आयुष्यात अशांतता येऊ शकते. तसेच तुमचे आयुष्य खूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. मोठे नुकसान देखील होऊ शकते. त्यासाठी येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी संयम बाळगणे आवश्यक आहे.

त्वचेच्या रोगांपासून सुटका कशी मिळवायची?

दरम्यान, नैनीताल येथील सुमित भंडारी सांगतात की, त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून त्वचेच्या आजारांनी ग्रासले आहे. उपचार घेतात, पण फारसा फायदा होताना दिसत नाही. यावर उपाय काय आहे? यावर आचार्य स्पष्टपणे म्हणतात की, तुमच्या शरीरातील रक्तविकारांच्या शुद्धीकरणाची गरज आहे. जोपर्यंत रक्तात निर्माण होणारे विकार शरीरातून बाहेर पडणार नाहीत. तोपर्यंत तुम्हाला त्वचेचे आजार होत असतील. लक्षणीय बाब म्हणजे त्वचेचे आजार रक्ताशी संबंधित असतात.

वरुण मुद्राचा नियमित करा अभ्यास 

यावेळी आचार्य यांनी जीवनात येणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी वरण मुद्राचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी १५ मिनिटे वरुण मुद्रेचा अभ्यास केला पाहिजे असे ते म्हणतात. काही दिवसांनी त्याचा चमत्कारी परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येईल. रक्ताच्या विकारांच्या शुद्धीकरणासाठी ही एक प्रभावी मुद्रा मानली जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी