गरम पाणी पिण्याने का कमी होते वजन, कशाप्रकारे होतो फायदा? घ्या जाणून

लाइफफंडा
Updated Aug 06, 2020 | 19:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाणी हे मानवासाठी हवे इतकेच गरजेचे आहे. तसेच पाणी हा अनेक समस्यांचा उपायही आहे. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर गरम पाणी प्यायला सुरुवात करा.

Water
(प्रातिनिधीक फोटो) फोटो सौजन्य: iStockImages  

थोडं पण कामाचं

  • मानवी शरीरासाठी पाण्याची गरज क्षणोक्षणी असते
  • पाण्यामुळे शरीराला होणाऱ्या फायद्यांबद्दल खूप संशोधन झाले आहे
  • पाणी आपल्या शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठीही सहाय्यकारी आहे

या आधुनिक काळात (modern times) पाणी हे आपल्यासाठी (value of water) सोन्यापेक्षाही किंमती झाले आहे. या धरतीवर जीवन जगण्यासाठी पाणी सर्वाधिक गरजेचे आहे. फक्त तहान (thirst) भागवण्यासाठी नाही, तर आपल्या शरीराचे कार्य (body system) व्यवस्थित चालण्यासाठीही पाणी आवश्यक आहे. पाणी अनेक आजार मानवी शरीरापासून दूर ठेवते. मानवी शरीराचा 70 टक्के भाग (70% human body has water) पाण्याने बनलेला आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य व्यवस्थित पद्धतीने चालण्यासाठी दिवसात 2-3 लीटर (2-3 liters water daily) पाणी प्यायला हवे.

पाणी पिऊन जाडपणा कमी करा

थंड आणि गरम पाण्याचे वेगवेगळे फायदे आणि नुकसान आहेत. अवघड कसरत किंवा व्यायाम केल्यानंतर थंड पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि गरम पाणी पिण्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय असेही मानले जाते पाणी (खासकरून गरम पाणी) प्यायल्याने काही प्रमाणात वजन कमी होते. इथे आम्ही आपल्याला सांगणार आहोत की यात किती तथ्य आहे.

संशोधनाचे अनुमान काय सांगते?

संशोधनातून असे सिध्द झाले आहे की जास्त पाणी प्यायल्याने वजनात घट होते. याचे कारण असेही असू शकते की अधिक पाणी प्यायल्याने शरीराला भूक जाणवत नाही आणि आपले शरीर अधिक पोषक तत्वे शोषून घेते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते. 2003मध्ये प्रसिध्द झालेल्या इतर संशोधनांतून समोर आले आहे की गरम पाणी प्यायल्याने वजन घटण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि जेवणापूर्वी अर्धा तास 500 मिलीलीटर पाणी प्यायल्याने पचनक्रिया 30 टक्क्याने वाढते.

गरम पाणी आणि वजन कमी होणे

दररोज सकाळी गरम किंवा कोमट पाणी वजन कमी करण्यासाठी तीन प्रकारे सहाय्यक असते-

1. पचनक्रिया- गरम पाणी आपल्या शरीरातील अंतर्गत तापमान कमी करते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

2. चरबी कमी करते- गरम पाणी आपल्या चरबीचे मॉलेक्यूल्स तोडून शरीरातील चरबी कमी करण्यास सहाय्य करते. यामुळे पचन सुलभ होते.

3. भूक कमी करते- गरम पाणी आपली भूक कमी करते. जेवणापूर्वी अर्धा तास एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने अन्नपचन सोपे होते.

गरम पाण्याचे इतर फायदे

आपण आधीच पाहिल्याप्रमाणे गरम पाण्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. याशिवाय यामुळे बध्दकोष्ठतेसारख्या समस्येतून आराम मिळतो. गरम पाण्यामुळे आपल्या आतड्यांचे आकुंचन कमी होते, ज्यामुळे मलविसर्जन सुलभ होते. याशिवाय यामुळे आपल्याला घाम येत राहतो आणि त्यासोबत शरीरातील विषारी तत्वेही बाहेर पडतात. गरम पाणी पिण्याने आपली मज्जासंस्था स्थिर राहते आणि यामुळे संपूर्ण दिवस चांगला जातो.

(टिप : वजन कमी करण्यासाठी गरम पाणी नियमित पिण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी