Tips To Get Rid Of Rat: घरातील उंदरामुळे झालाय त्रस्त? या घरगुती उपायांनी मिळेल सुटका

लाइफफंडा
Updated Jun 14, 2022 | 09:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tips To Get Rid Of Rat । घरात उंदीर असणे हे एखाद्या मोठ्या समस्येपेक्षा कमी नाही. कारण ते घरातील सर्व काही कुरतडतात आणि त्याची नासाडी करतात. मग ते धान्य, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू असो.

Doing these home remedies will get the rats out of the house
घरातील उंदरापासून सुटका मिळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घरात उंदीर असणे हे एखाद्या मोठ्या समस्येपेक्षा कमी नाही.
  • तमालपत्र देखील उंदीर दूर करण्यास मदत करू शकतात.
  • उंदरांना कांद्याचा वास अजिबात सहन होत नाही.

Tips To Get Rid Of Rat । मुंबई : घरात उंदीर असणे हे एखाद्या मोठ्या समस्येपेक्षा कमी नाही. कारण ते घरातील सर्व काही कुरतडतात आणि त्याची नासाडी करतात. मग ते धान्य, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू असो. ते केवळ सामानच कुरतडत नाहीत तर अनेक रोग देखील पसरवतात. म्हणूनच त्यांना घरातून हाकलून देणे अत्यंत गरजेचे आहे. (Doing these home remedies will get the rats out of the house). 

अशा परिस्थितीत उंदरांच्या दहशतीपासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात, त्यातील काही उपायांचा परिणाम होतो तर काही उपाय बिनकामाचे निघतात. तसेच काही लोक उंदीर मारण्यासाठी उंदीर मारण्याचे औषध वापरतात, त्यामुळे घरात उंदीर मरतो आणि अशा परिस्थितीत दुर्गंधी पसरते.

अधिक वाचा : दहावीच्या निकालाला उरले काही तास

घरातील उंदरांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

  1. लाल मिरची - जर तुम्हालाही घरातून उंदीर बाहेर काढायचे असतील तर तुम्ही लाल तिखट मिरची वापरू शकता. यासाठी घरात बहुतांश ठिकाणी लाल मिरच्या ठेवाव्यात. असे केल्याने उंदीर पुन्हा येणार नाहीत.
  2. तमालपत्र - तमालपत्र देखील उंदीर दूर करण्यास मदत करू शकतात. खर तर उंदरांना तमालपत्राचा वास अजिबात आवडत नाही. अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी उंदीर जास्त येतात त्या ठिकाणी तमालपत्र ठेवावे.
  3. कांदा - उंदरांपासून मुक्ती मिळवण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे. कारण उंदरांना कांद्याचा वास अजिबात सहन होत नाही. यासाठी उंदराच्या बिळांसह ज्या ठिकाणी उंदीर येतात त्या ठिकाणी कांद्या कापून ठेवावा. 
  4. पुदीन्याचे तेल - पुदिन्याच्या तेलाचा सुगंध उंदरांना बिल्कुल आवडत नाही. यासाठी एका कापसाच्या बॉलमध्ये पुदिना तेल टाका आणि ज्या ठिकाणी उंदीर येतात त्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने ते येणार नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी