Chanaka Niti: या 4 गोष्टींनंतर अंघोळ करायला विसरू नका, नाहीतर भोगावे लागू शकतात वाईट परिणाम

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jul 25, 2022 | 07:31 IST

आचार्य चाणक्याच्या चाणक्य नीतीमध्ये सामान्य जीवन बदलण्याची क्षमता आहे. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी संपत्ती (wealth) आणि लक्ष्मी (Lakshmi) संदर्भात अनेक धोरणे सांगितली आहेत. आचार्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमधून अनेक जीवन (life)कसे जगावे याची धोरणे सांगितली आहेत.

Chanaka Niti
या 4 गोष्टींनंतर अंघोळ करायला विसरू नका  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चाणक्यांनी चांगल्या आरोग्यासाठी काही नियमही सांगितले आहेत.
  • चाणक्य नीतीमधून अनेक जीवन कसे जगावे याची धोरणे सांगितली आहेत.
  • अंत्ययात्रेतून परतल्यानंतर स्नान केल्याशिवाय घरात प्रवेश करू नये.

Chanaka Niti: आचार्य चाणक्याच्या चाणक्य नीतीमध्ये सामान्य जीवन बदलण्याची क्षमता आहे. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी संपत्ती (wealth) आणि लक्ष्मी (Lakshmi) संदर्भात अनेक धोरणे सांगितली आहेत. आचार्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमधून अनेक जीवन (life)कसे जगावे याची धोरणे सांगितली आहेत. आचार्य चाणक्य यांची धोरणे आजच्या युगात अवघड वाटत असली तरी त्यांचे महत्त्व समजून जीवनात अंगीकारले तर प्रत्येक समस्या दूर होऊ शकतात.

चाणक्य म्हणतात की आरोग्य ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. चाणक्यांनी चांगल्या आरोग्यासाठी काही नियमही सांगितले आहेत.  आचार्य चाणक्य यांनी अशा चार कामांबद्दल सांगितले आहे, ज्यानंतर आंघोळ केलीच पाहिजे, अन्यथा मनुष्य अनेक रोगांनी घेरला जाऊ शकतो.

तैलाभ्यङ्गे चिताधूमे मैथुने क्षौरकर्मणि।
तावद् भवति चाण्डालो यावत् स्नानं न चाचरेत्।

Read Also : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

अंत्यसंस्कार

आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकाद्वारे सांगितले आहे की, अंत्ययात्रेतून परतल्यानंतर स्नान केल्याशिवाय घरात प्रवेश करू नये. स्मशानभूमीच्या वातावरणात अनेक प्रकारचे जंतू असतात जे व्यक्तीच्या संपर्कात येतात. अशा परिस्थितीत आंघोळ न करता राहणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना या जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर लगेच आंघोळ करावी.

Read Also : पटेलच्या वादळी अर्धशतकामुळे भारताचा विजय

तेल मालिश

त्वचा आणि रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी अनेकदा लोक शरीराला तेल लावतात. तेल मसाज केल्यावर शरीराचा आतील भाग बाहेर येतो. अशा स्थितीत मसाज केल्यानंतर लगेच आंघोळ करावी. या अवस्थेत आंघोळ न करता कपडे परिधान केल्याने सर्व घाण पुन्हा शरीरात जाते.

Read Also : घराच्या सुखासाठी असे असावे स्वयंपाक घर

शारीरिक संबंध

चाणक्य नीतीनुसार, शारीरिक प्रेमसंबंधानंतर आंघोळ केली पाहिजे कारण यामुळे शरीर अशुद्ध होते. स्नान वगैरे न करता पूजा करणे अशुभ आहे.

केस कापल्यानंतर

चाणक्याच्या मते, केस कापल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे कारण लहान केस शरीरात अडकतात जे आंघोळ केल्याशिवाय शरीरावरुन निघत नाहीत.  अशा परिस्थितीत ते पोटात गेल्यास तब्येत बिघडते आणि संसर्ग होण्याचाही धोका असतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की टाइम्स नाउ कोणत्याही प्रकारच्या प्रमाणीकरणास, माहितीला मान्यता देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी