Lifestyle | मुंबई : वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. झाडे-रोपे योग्य दिशेने लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होत असतात. तर चुकीच्या दिशेने लावलेली झाडे आणि रोपे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. चला तर म जाणून घेऊया कोणती ५ झाडे योग्य दिशेने लावल्याने घरातील सुख-समृद्धी कायम राहते. (Don't plant these trees in the south by mistake, there will be financial crisis in the house).
अधिक वाचा : धनंजय मुंडेंना हार्ट अटॅक नाही आला - अजित पवार
तुळशीचे रोप - तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप शुभ असते. ही रोपे घरात लावल्याने सुख-समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीची लागवड कधीही दक्षिण दिशेला करू नये. कारण या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने आर्थिक स्थिती बिघडते. त्याची लागवड नेहमी पूर्व, उत्तर किंवा पूर्व-उत्तर दिशेला करावी.
शमीची वनस्पती - वास्तुशास्त्रानुसार शमीचे रोप दक्षिण दिशेला लावू नये. खर तर या दिशेला शमीचे रोप लावल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात. ही वनस्पती पूर्व किंवा ईशान्ये दिशेला लावावी. या दिशेला लावलेल्या शमीच्या रोपामुळे वास्तुदोष दूर होतात.
रोझमेरीची वनस्पती - वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये रोझमेरीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. याशिवाय ही वनस्पती शारीरिक आणि मानसिक समस्या दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. वास्तुशास्त्रानुसार ही वनस्पती दक्षिण दिशेला लावू नये.
मनी प्लांट - वास्तुशास्त्रानुसार घर आणि ऑफिसमध्ये मनी प्लांट लावणे शुभ असते. तसेच वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटचे रोप दक्षिण दिशेला लावू नये. आग्नेय कोनात म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला मनी प्लांटची लागवड करणे शुभ असते.
केळीचे झाड - केळीचे झाड भगवान विष्णुला खूप प्रिय असते असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला केळीचे रोप लावू नये. ते ईशान्ये दिशेला लावणे सर्वात योग्य आहे.