Happy BR Ambedkar Jayanti 2022 Wishes Images, Quotes : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशात आणि परदेशात खूप उत्साहात साजरी केली जाते. प्रत्येक वर्षी 14 एप्रिलला त्यांचा जन्मोत्सव हा त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आयुष्यभर दलितांना न्याय आणि अधिकार मिळावेत यासाठी मोठा संघर्ष केला आहे. यासाठीच भीम जयंती समता दिवस आणि ज्ञान दिवस म्हणून साजरी केली जाते. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे जन्मलेल्या आंबेडकर यांच्या वडीलांचे नाव रामजी मालोजी सकपाल आणि आईचे नाव भीमाबाई होते. आंबेडकर यांनी आयुष्यात संघर्ष करत उच्च शिक्षणासह समाजाला शिक्षित केले.
भारतात आंबेडकर जयंती मोठ्या आनंदात साजरी केली जाते. दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी झाली नाही. पण या वर्षी नियम शिथील करण्यात आले आहे. तरी सोशल मीडियाच्या माध्यामातून तुम्ही आंबेडकर जयंती निमित्त मेसेज, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून एकमेकांना शुभेच्छांसह देऊ शकता. तसेच घरच्या घरीच तुम्ही आंबेडकरांना अभिवादन करावे असे ही सांगण्यात आले आहे.
सागराचे पाणी कधी आटणार नाही
बाबांची आठवण कधी मिटणार नाही
हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी,
नाद भिम जयंतीचा सुटणार नाही.
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले त्याने,
शिक्षणाचे महत्व समजावले ज्याने,
समाजात मान वर करून
जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
कुणी म्हणतात भिमराव,
कुणी म्हणतात बाबा
अशा या महामानवाचा
आजही आहे सर्वांवर ताबा
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
उद्धारली कोटी कुळे
भिमा तुझ्या जन्मामुळे
आंबेडकर जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!
कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करुन दावली..
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरुन दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे,
पाणी आग विझवते.
पण माझ्या भिमाने तर
पाण्यालाच आग लावली..
आंबेडकर जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!
नमन तया देशप्रेमाला
नमन तया सागराला,
नमन तया ज्ञान देवतेला
नमन तया महापुरुषाला..
आंबेडकर जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त
त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
भीम जयंतीचे आणखी मेसेज पाठवा...
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
‘मनुस्मृती’दहन करून “भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास कोटी-कोटी प्रणाम.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचावेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर तर जगात एक होता….!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
फुलांची कथा बहरांनी लिहिली होती
ताऱ्यांनी रात्रीची कथा लिहिली
आम्ही कोणाचे गुलाम नाही
कारण बाबासाहेबांनी आमचे जीवन लिहिले!
भीम जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान)
लिहिले की, ज्याने भारत देश चालतोय.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न,महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम.
दगड झालोतर दिक्षाभूमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
आम्हा नको बा भीमा, त्या कागदी नोटांवर कारण,
नाव त्यांचे आहे साऱ्या जगाच्या ओठांवर…
असतील किती नोटांवाले पण, कायदा भीमाच्चा
नाचवतोय साऱ्यांना, एका बोटावर…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
सजली अवघी धरती पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
भीम जयंती शुभेच्छा.
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
१४ एप्रिल म्हणजे
आमच्या जीवनाची पहाट
१४ एप्रिल म्हणजे मानवतेची लाट
१४ एप्रिल म्हणजे सुखाची भरभराट
१४ एप्रिल म्हणजे समृद्धीची वाट
१४ एप्रिल म्हणजे मनूचा थरथराट
१४ एप्रिल म्हणजे बुदधाशी गाठ
१४ एप्रिल म्हणजे विजयाचा थाट!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
सजली अवघी धरती पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यानं
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
भीम जयंती शुभेच्छा.
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.