Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan 2021 आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे मराठी संदेश Marathi Messages, Whatsapp Messages

Mahaparinirvan 2021, 65th Mahaparinirvan Diwas दरवर्षी ६ डिसेंबर या दिवशी महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण केले जाते.

Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे मराठी संदेश 
थोडं पण कामाचं
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे मराठी संदेश
  • दरवर्षी ६ डिसेंबर या दिवशी महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करतात
  • महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे चिंतन करतात तसेच बाबासाहेबांची पुस्तके वाचनू त्यांचे स्मरण करतात

Mahaparinirvan 2021 डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.

 

हा नियम लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या हाती येणारे वेतन घटणार  Also Read :  हा नियम लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या हाती येणारे वेतन घटणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्रात पीएच. डी केली. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांनी अर्थशास्त्र, प्राध्यापक आणि वकील म्हणून कारकिर्द सुरू केली. नंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.

अनुयायांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. भारत सरकारने १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. 

तुमच्या पीएफ खात्याबरोबर ७ लाखांचा हा फायदा मोफत मिळतो... Also Read : तुमच्या पीएफ खात्याबरोबर ७ लाखांचा हा फायदा मोफत मिळतो...

दरवर्षी १४ एप्रिल हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून साजरा करतात. तसेच ६ डिसेंबर या दिवशी महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते. यंदा सोमवार ६ डिसेंबर २०२१ रोजी ६५वा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवशी आपण आंबेडकरांवरील पुस्तके वाचून वेळ सत्कारणी लावू शकता. बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे चिंतन करून त्यांचे स्मरण करू शकता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जन्म - १४ एप्रिल १८९१, महू
मृत्यू (महापरिनिर्वाण) - ६ डिसेंबर १९५६, नवी दिल्ली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सोने

  1. मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  3. सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  4. बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  5. कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे मराठी संदेश

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी