Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023 Song : : देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला साजरी केली जाते. डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला होता. आंबेडकर यांचे जीवन पूर्ण संघर्षपूर्ण राहिले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान निर्माण करण्यामध्ये त्यांनी अभूतपूर्व योगदान दिलं. डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आयुष्यभर दीन, गरीब लोकांच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचा 14 एप्रिल रोजी जन्मदिवस आहे, त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचे अभिवादन करणारे लोकप्रिय गाणे ऐकू.. (Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary : Play popular songs on Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary)
जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांचे एक कट्टर अनुयायी आणि एक सामाजिक कार्यकर्ता होते. त्यांनी 14 एप्रिल 1928 रोजी पुणे येथे पहिल्यांदा डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. त्यांनीच आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिवव्यवस्थेविरुद्धात आवाज उठवला होता आणि दलित लोकांना त्यांचा हक्क मिळवून दिला.
माझा भिमराव नंबर १ भिम गीत
गायक - अक्षय कर्डक
नवक्रांतीच्या दिशेने
गायक - मिलिंद शिंदे
माझ्या भीमानं लिवलय संविधान
गायक -
राकेश मोरे
आली जयंती माझ्या भीमाची
गायक - समिंद्र गिरे
घटनेच्या पानावर
गायक - आनंद शिंदे
मया भिमानं सोन्यानं भरली ओटी
गायिका - कडूबाई खरात