आज शिवजयंती...या निमित्त काढा सहजसुंदर रांगोळ्या

लाइफफंडा
Updated Feb 19, 2021 | 12:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

आज शिवजयंती राज्यभरात साजरी केली जात आहे. त्या निमित्त तुम्ही सहजसुंदर रांगोळ्या काढू शकता. पाहा या रांगोळ्यांचे व्हिडिओ

shivaji maharaj
आज शिवजयंती...या निमित्त काढा सहजसुंदर रांगोळ्या  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • राज्यात शिवजयंतीचा मोठा उत्साह
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी
  • शिवजयंतीनिमित्त काढा सहजसुंदर रांगोळ्या

मुंबई: अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. संपूर्ण महाराष्ट्राभर आज शिवजयंतीचा उत्साह आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कमी जनमानसांत ही जयंती साजरी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा केला जात आहे. 

शिवजयंतीच्या निमित्ताने विविध ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या रेखाटल्या जातात. शिवाजी महाराजांचा पराक्रम या रांगोळ्याच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचवला जातो. अशाच काहीशा सोप्या आणि सहजसुंदर रांगोळ्या तुम्हाला काढायच्या आहेत का? तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सहजसुंदर रांगोळ्या. शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अनेक मंत्र्यांनी शिवनेरीवर हजेरी लावत शिवजयंतीचा उत्सव साजरा केला. 

जाणून घ्या या सहजसुंदर रांगोळ्या...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी