Dussehra 2020 Rangoli designs: दसऱ्याच्या दिवशी या सुंदर रांगोळ्यांनी सजवा आपले घर

लाइफफंडा
Updated Oct 24, 2020 | 11:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

नवरात्रीत दुर्गादेवीचा आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर दसऱ्याचा सण साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी किंवा आयुधपूजा असेही म्हणतात. हा सण दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीच्या तिथीला साजरा केला जातो.

Rangoli designs
Dussera 2020 Rangoli designs: दसऱ्याच्या दिवशी या सुंदर रांगोळ्यांनी सजवा आपले घर  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • सुंदर रांगोळी काढून वाढवा दसऱ्याची शोभा
  • काय आहे दसऱ्याची कथा?
  • रांगोळीमुळे वाढते घराचे मांगल्य

नवी दिल्ली: नवरात्रीत (Navratri) दुर्गादेवीचा (Goddess Druga) आशीर्वाद (blessings) प्राप्त केल्यानंतर दसऱ्याचा (Dussera) सण साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी किंवा आयुधपूजा असेही म्हणतात. हा सण दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीच्या तिथीला साजरा केला जातो. या वर्षी २५ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे.

सुंदर रांगोळी काढून वाढवा दसऱ्याची शोभा

या दिवशी आपण आपल्या घरी किंवा अंगणात रांगोळी काढू शकता. जर आपणही यासाठी सुंदर रांगोळीची डिझाईन्स शोधत असाल असाल तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १० उत्तम रांगोळी डिझाईन्स.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by sayali Phokmare (@hands_imagine) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Purva Nachan (@rangoon_ki_goli) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Purva Nachan (@rangoon_ki_goli) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Art knack by Aditi (@art_knack_by_aditi_) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Art knack by Aditi (@art_knack_by_aditi_) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Purva Nachan (@rangoon_ki_goli) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Sreedhar (@kreative_kanya) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RAS (@sr_rangoli.art) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhu Creative Collection (@madhavi_devi369) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rangoli Designs & Kolam Design (@easyrangoli) on

काय आहे दसऱ्याची कथा?

कथेनुसार रावणाने सीतेचे अपहरण केले. सीता ही एक राणी असूनही रावणाने तिचे अपहरण केले तर सामान्य स्त्रियांची परिस्थिती काय असेल? मात्र रामाने रावणाविरुद्ध युद्ध पुकारले आणि दहा दिवसांच्या घनघोर लढाईनंतर रावणाचा वध केला. तो दिवस होता अश्विन शुक्ल दशमी, ज्यादिवशी रामाने दुर्गादेवीने दिलेल्या दिव्य अस्त्राने रावणाचा वध केला. त्यामुळे हा दिवस अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.

रांगोळीमुळे वाढते घराचे मांगल्य

कोणत्याही शुभदिनी घरात, देवघरात किंवा अंगणात रांगोळी काढणे ही आपली परंपरा आहे. रांगोळीतील रंगांमुळे मन तर प्रसन्न होतेच, पण घरातील ताणतणाव कमी होऊन मांगल्य येते. रांगोळीने पाहुण्यांचे, घरात सणाच्या दिवशी येणाऱ्या देवदेवतांचे स्वागत करण्याची आपली पद्धत आहे. रांगोळीच्या सौंदर्यामुळे त्यांचे आणि आपलेही मन आनंदी राहते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी