आपल्या चेहऱ्यानुसार करा इअररिंग्जची निवड, या आहेत टिप्स

लाइफफंडा
Updated Mar 31, 2019 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

महिला सुंदर दिसण्यासाठी विविध दागिने वापरतात. मात्र या दागिन्यांमध्ये महत्त्वाचा म्हणजे कानातले. आपल्यावर कोणत्या प्रकारचे कानातले शोभून दिसतील. जाणून घेण्यासाठी या आहेत टिप्स...

earrings
कानातले  |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई : महिला सुंदर दिसण्यासाठी विविध आपली सुंदरता वाढवण्यासोबतच आपल्या श्रृगांवरही लक्ष देतात ज्यामुळे त्या आकर्षक दिसतात. यापैकी एकच म्हणजे कानातले ज्यामुळे चेहऱ्याची सुंदरता अधिक वाढते. मात्र हे कानातले आपल्या चेहऱ्याला सूट होण्यासारखे घातले तर चांगेल वाटतात नाहीतर ते चेहऱ्याची सुंदरता बिघडवतात. यासाठी जाणून घ्या आपल्या चेहऱ्याच्या अनुसार कोणत्या प्रकारचे कानातले तुम्ही घातले पाहिजेत. 

  1. चौकोनी चेहरा - जर तुमचा चेहरा चौकौनी आहे तर अशा चेहऱ्यावर गोल आणि टियर ड्रॉप इअरिंग्स शोभून दिसतात. चौकोनी चेहऱ्यावर मोठे स्टोन्स असलेले इअररिंग्च्या ऐवजी छोटे छोटे स्टोन्स असलेले इअररिंग्ज वापरा.
  2. हार्ट आकाराचा चेहरा - अशा चेहऱ्याच्या व्यक्तींनी नेहमी लांब आण घुमावदार इअररिंग्ज निवडावे. या मुळे चेहऱ्याची सुंदरता अधिक वाढते. अभिनेत्री प्रियंका चोप्राचा चेहरा असा आहे. 
  3. गोलाकार चेहरा - गोलाकार चेहरा असलेल्या महिलांनी चेहरा भरलेला दिसेल असे कानातले घालू नये. कमी लांब असलेले ड्रॉप इअररिंग्ज अशा प्रकारच्या चेहऱ्याला सूट करतात. गोल चेहऱ्याच्या महिलांनी गोलाकार डिस्क असलेले कानातले घालू नयेत. 
  4. डायमंड चेहरा - डायमंड आकाराच्या चेहऱ्यावर लांब आणि कर्व्हस असलेले कानातले चांगले वाटतात. जास्त स्टोन असलेले आणि हूप इअररिंग्जही या प्रकारच्या चेहऱ्यावर चांगले दिसतात. 
  5. अंडाकार चेहरा - अभिनेत्री कतरिना कैफचा चेहरा अंडाकार आकाराचा आहे. या चेहऱ्यावर सगळ्या प्रकारचे इअररिंग्ज चांगले वाटतात. जास्त लांबीचे इअर रिंग्ज या चेहऱ्यावर चांगले वाटत नाहीत. 
  6. लांब चेहरा - ज्यांचा चेहरा लांब असतो अशा व्यक्तींना जास्त लांबीचे इअररिंग्ज चांगले वाटत नाहीत. या चेहऱ्यावर छोटे स्टड अथवा ड्रॉप इअर रिंग्ज चांगले वाटतात. यामुळे चेहरा रूंद वाटतो आणि एक वेगळाच लूक येतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी