ताण-तणाव दूर करण्यासाठी एक वाटी खा दही, क्षणात फ्रेश होईल मूड

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jun 24, 2021 | 08:55 IST

सध्याच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या व्यापामुळे अनेकजण तणावात आपले जीवन जगत असतात. तणावामुळे अनेकांना शारिरिक व्याथी होत असतात.

Eat a bowl of yogurt to relieve stress
ताण-तणाव दूर करण्यासाठी एक वाटी खा दही  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • दही मेंदूमध्ये होणाऱ्या हार्मोन्स स्त्रावामध्ये देखील मुख्य भूमिका बजावते.
  • संशोधक अल्बान गॉल्टियर, पीएचडी यांच्या मते दही आरोग्य आणि मूड दोन्ही निरोगी राखण्याचे काम करते.
  • दह्याचे सेवन केल्याने बॅक्टीरिया नियंत्रित राहतात आणि तणाव कमी करून मेंदूदेखील निरोगी राहत असतो.

नवी दिल्ली : सध्याच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या व्यापामुळे अनेकजण तणावात आपले जीवन जगत असतात. तणावामुळे अनेकांना शारिरिक व्याथी होत असतात. ताण- तणाव कमी करण्यासाठी डॉक्टर विविध उपाय सांगत असतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एका उपयाविषयी सांगत आहोत, ज्यामुळे तुमचा ताण कमी होण्यास मदत होईल. तुमचा तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही पण तुम्हाला मात्र खाण्याची कृती करावी लागेल. तणाव दूर करण्यासाठी दही एक चांगला पदार्थ असल्याचं सांगतलं जात आहे. तुमचा मूड खराब झाला असेल तर एक वाटी दही खावे. जेणेकरून तुमचा ताण कमी होण्यास मदत होईल. अर्थात ताण तणावावर हा काही रामबाण उपाय नाही पण तुमचा ताण थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत करेल. 

दही तसा एक साधा पदार्थ जो प्रत्येकाच्याच घरी असतो पण तुम्हाला माहित आहे का दही म्हणजे आपल्या आरोग्याला लाभलेले वरदान आहे आणि ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक आहे. दह्याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत. काही महिन्यांपूर्वी एका संशोधक गटाने दुधाबाबतीत एक संशोधन केले आणि त्यात त्यांनी दुधाच्या फायद्याची पूर्ण यादीच सिद्ध केली.संशोधकांनी हे सिद्ध केले आहे की दह्याच्या सेवनाने लोक आपला तणाव दूर करू शकतात. हे संशोधन साइंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

दह्यात आढळतात बॅक्टीरिया फ्रेंडली जीवाणू

संशोधकांना हे आढळून आले की दह्यामध्ये लेक्टोबेसिलस (Lactobacillus) असते जो एक प्रकारे बॅक्टीरिया फ्रेंडली जीवाणू आहे. हे शरीराध्ये माइक्रोबायोमच्या कॅरेक्टरला बदलण्यात महत्त्वाची भूमिका आणि बजावतात. त्यामुळेच डिप्रेशन अर्थात तणाव नष्ट होतो. दही मेंदूमध्ये होणाऱ्या हार्मोन्स स्त्रावामध्ये देखील मुख्य भूमिका बजावते. या संशोधनामध्ये हे सुद्धा सांगण्यात आले आहे की माइक्रोबायोमच्या (microbiome) माध्यमातून तणाव वाढवणारे हार्मोन्स हे गूड फील हार्मोन्समध्ये रुपांतरीत होतात.

सकाळी करा दह्याचे सेवन

संशोधकांच्या मते दह्याचे सेवन केल्याने केवळ बॅक्टीरिया नियंत्रित करण्यात मदत मिळत नाही तर तणाव कमी करून मेंदू निरोगी राखण्याचे देखील काम करते. म्हणून खास करून तुम्ही सकाळी सकाळी दह्याचे सेवन केले पाहिजे. याचा शरीरावर अजून चांगला परिणाम होतो असे जाणकार सुद्धा सांगतात. या संशोधनामधून हे देखील स्पष्ट झाले आहे की दह्यात असणारे माइक्रोबायोम मानसिक स्वास्थ्याच्या चांगल्या आणि वाईट वागणुकीशी निगडीत असतात.

क्षणात मूड होतो ठीक

दही बाबत सेंटर फॉर ब्रेनचे मुख्य संशोधक अल्बान गॉल्टियर, पीएचडी यांच्या मते दही आरोग्य आणि मूड दोन्ही निरोगी राखण्याचे काम करते. संशोधनामध्ये हे दिसून आले आहे की माइक्रोबायोम मानसिक स्वास्थ उत्तम राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे संशोधन 2014 साली प्रकाशित झाले होते ज्यात सांगण्यात आले होते की दही सारखे प्रोबायोटिक्स शरीराला अनुकूल असणाऱ्या बॅक्टीरियाचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात आणि लोकांना तणावमुक्त ठेवतात.

तणाव दूर करण्यात दही आहे चांगला पर्याय

दही बाबत केल्या गेलेल्या या संशोधनामधील लीड प्रोफेसर अलबान गॉलटियर यांचे म्हणणे आहे की सध्या तरी डिप्रेशनवर ठोस असा उपाय उपलब्ध नाही. तसेच या आजाराला तोंड देणारे लोक अनेक इतर साइड इफेक्ट्सला देखील बळी पाडतात. म्हणून या आजारावर एखादा साधा सोपा घरगुती उपाय गरजेचा होता, जो आपल्याला दह्याच्या रुपात मिळाला आहे. तुम्ही आपल्या नियमित आहारामध्ये एक वाटी दहीचा समावेश करा आणि बघा तुम्हाला स्वत:लाच फरक दिसू लागेल मात्र रात्रीच्या वेळेस दही खाऊ नये.

सूचना - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. डिप्रेशनवर हा उपाय रामबाण असल्याचा कोणत्याही प्रकारे दावा यातून केला जात नाही आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जाणकारांशी आणि उपचारासाठी डॉक्टरांशी एकदा संपर्क करावा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी