दाढी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'हे' ५ पदार्थ, डाएमध्ये करा समावेश

लाइफफंडा
Updated May 06, 2020 | 12:57 IST | टाइम्स नाऊ हिंदी

घनदाट आणि लांब दाढी अनेक पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारते. तुम्हालाही दाढी वाढवायची आहे तर या पौष्टिक पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा.

how to grow beard naturally
grow beard naturally (प्रातिनिधीक फोटो) 

थोडं पण कामाचं

  • सध्या मुलांमध्ये दाढी ठेवण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे
  • आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास वाढेल दाढी
  • दाढी वाढवायची तर या गोष्टींचा आहारात जरूर करा समावेश

मुंबई: सध्या तरुणाईमध्ये दाढी वाढवण्याचा मोठा ट्रेंड आला आहे. लांब दाढी आणि मिशी असलेल्या तरुणांच्या वयाचा अंदाज लावणे अनेकदा कठीण होऊन जाते. कमी वयाची मुले अनेकदा झटपट दाढी वाढवण्यासाठी विविध उपाय करत असतात. तुम्हालाही जर घनदाट आणि लांब दाढी हवी असेल तर काही पौष्टिक पदार्थांचा वापर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये जरूर करावा लागेल. पौष्टिक पदार्थांच्या सेवनाने तुम्ही केवळ स्वस्थच राहणार ही तर दाढीचे केसही झटपट वाढतील.

दाढी वाढवण्यासाठी करा या पौष्टिक पदार्थांचे सेवन

ट्युना – जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर टुना माशांचा आपल्या आहारात समावेश करा. या माशामध्ये ओमेगा ३ फॅटी असिड मोठ्या प्रमाणात असते. त्वचा आणि केसांना चमक आणण्यासाठी या माशाचे सेवन करा. याच्या सेवनाने केसांचे रोमछिद्रे उघडण्यास मदत होते. दररोज याचे सेवन केल्यास केस आणि त्वचा दोघांनाही फायदा होतो. तुम्हाला दाढी जर झटपट वाढवायची आहे तर या माशाचा तुमच्या आहारात जरूर समावेश करा.

मसूर डाळ – सोयाबीन, स्टार्चयुक्त बीन्स आणि मटार हे प्रोटीनचे महत्त्वपूर्ण स्त्रोत मानले जातात. जर तुम्ही शाकाहारी आहात मसूर डाळ तुमच्या शरीरातील प्रोटीनची गरज भागवते. हे सर्व पदार्थ दाढीच्या केसांच्या विकासासाठी फायदेशीर आहेत.

पालक – पालक भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, फोलिक अॅसिड, लोह सारखी पोषकतत्वे असतात. पालकाची भाजी तुम्ही घरात बनवत असालच. याचा ज्यूस पिणेही शरीरासाठी तितकेच फायदेशीर ठरते. केसांच्या विकासासाठी पालकही फायदेशीर ठरतो. याच्या सेवनाने लाल पेशी निर्माण होण्यास मदत होते. ज्यामुळे केसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जातो.

दालचिनी – दालचिनी हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे जो प्रत्येक घरात आढळतो. अनेकजण दालचिनी आणि लिंबाची पेस्ट करून दाढीवर लावतात. ज्यामुळे त्वचेचे पोर्स ओपन होण्यास मदत होते. या शिवाय दालचिनीचे सेवनही तुम्ही करू शकता. यामुळे केसांच्या मुळांशी ऑक्सिजनयुक्त रक्त संचार वाढवण्यास मदत होते. सकाळी कोमट पाणी आणि मधासोबत दालचिनीचे सेवन करावे.

भोपळयाच्या बिया – भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे केसांचा विकास होण्यास मदत होते. भोपळ्याच्या बियांना मगज म्हणतात जे तुम्हाला दुकानांमध्ये सहज मिळून जाईल. या बिया सुकवलेल्या असतात ज्यामुळे दीर्घकाळ याचा वापर केला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी