Bajra khichdi हिवाळ्यात खा 'बाजरा खिचडी'

Eating Bajra khichdi in winter will help you to control your weight हिवाळ्याच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी 'बाजरा खिचडी' अर्थात बाजरी या धान्यापासून तयार केलेली खिचडी खाणे उत्तम आहे.

Eating Bajra khichdi in winter will help you to control your weight
Bajra khichdi हिवाळ्यात खा 'बाजरा खिचडी' 
थोडं पण कामाचं
 • Bajra khichdi हिवाळ्यात खा 'बाजरा खिचडी'
 • बाजरीची खिचडी खाल्ल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते
 • बाजरीमध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर आणि लोह

Eating Bajra khichdi in winter will help you to control your weight हिवाळ्याच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी 'बाजरा खिचडी' अर्थात बाजरी या धान्यापासून तयार केलेली खिचडी खाणे उत्तम आहे. आठवड्यातून किमान दोन वेळा बाजरीची खिचडी खाल्ल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते. बाजरीमध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर आणि लोह हे शरीराला पोषक असलेले घटक आहेत. शिवाय बाजरी ग्लुटेन मुक्त (gluten free) आहे. काहीजण बाजरीच्या भाकऱ्या खाणे पसंत करतात तर काहींना खिचडी खाणे आवडते.

बाजरीची खिचडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य Bajra khichdi Recipe

 1. बाजरी - १ कप
 2. गाजर (चिरलेले): १/२ कप
 3. बीन्स - १/२ कप
 4. वाटाणे - १/२ कप
 5. हिरवी धुतलेली मूग डाळ - १/२ कप
 6. कांदा - १/२ कप
 7. हल्दी - १/४ टेबलस्पून
 8. मीठ - १ टेस्पून
 9. जिरे - १ टेस्पून
 10. लाल मिरची - १ टीस्पून
 11. तेल - १ टेस्पून

बाजरीची खिचडी तयार करण्याची कृती Bajra khichdi Recipe

 1. बाजरी धुवून तासभर पाण्यात भिजत ठेवा. तसेच मूग डाळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा.
 2. प्रेशर कुकर घ्या आणि त्यात एक चमचा तेल घाला नंतर एक चमचा जिरे घाला.
 3. आता चिरलेला कांदा घालून मंद आचेवर शिजवा. कांदा हलका तपकिरी झाला की त्यात गाजर घाला. नंतर त्यात चिरलेली बीन्स आणि मटार घाला. ढवळून घ्या.
 4. हलके शिजल्यानंतर त्यात मूग डाळ पाण्यासोबत घाला. आता बाजरीचे पाणी प्रेशर कुकरमध्ये ठेवा. त्यात अजून थोडं पाणी घालून उकळी आणा. 
 5. आता १ चमचा मीठ, तिखट आणि हळद घाला. खिचडी सारखी सुसंगतता येण्यासाठी थोडे जास्त पाणी घाला. 
 6. प्रेशर कुकरचे झाकण ठेवा. प्रेशर कुकरला तीन ते चार शिट्ट्या करू द्या. १० मिनिटे थंड होऊ द्या. गरमागरम खिचडी दह्यासोबत सर्व्ह करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी