केव्हा आहे बकरीद? जाणून घ्या, याचे महत्त्व आणि कुर्बानीचा हा सण का साजरा केला जातो?

Eid ul-Adha 2021: १२ जुलैपासून इस्लामी कॅलेंडरचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. जामा मस्जिदचे नायब शाही सय्यद शाबान बुखारी यांनी यासंदर्भातील घोषणा करताना म्हटले की ईद-अल-अधा चा सण २१ जुलैला साजरा करण्यात येईल.

Eid al-Adha 2021, Bakrid
बकरीद २०२१ 

थोडं पण कामाचं

  • बकरीद सणाच्या वेळेस काय होते
  • मीठी ईद आणि बकरीद मध्ये काय फरक आहे
  • बकरीदचे महत्त्व काय आहे

नवी दिल्ली: देशबर ईद-अल-अधा (Eid al-Adha)म्हणजे बकरीद चा सण (Bakrid) २१ जुलैला साजरा केला जाणार आहे. दिल्लीतील जामा मशीदचे नायब (Delhi Jama Masjid Imam Sayyad Shaban Bukhari) शाही इमाम सय्यद शाबान बुखारी यांनी ईद-अल-अधा म्हणजे बकरीद २१ जुलैला (Eid al-Adha 2021) साजरा करण्याची घोषणा केली आहे. १२ जुलैपासून इस्लामी कॅलेंडरचा (Islamic Calendar) शेवटचा महिना सुरू झाला आहे. हा महिना जुल हिज्जा या नावान ओळखला जातो. या महिन्याला इस्लाममध्ये मोठे महत्त्व आहे. जामा मस्जिदचे नायब शाही सय्यद शाबान बुखारी यांनी यासंदर्भातील घोषणा करताना म्हटले की ईद-अल-अधा चा सण २१ जुलैला साजरा करण्यात येईल. तर रविवारी इस्लामी महिना जिलहिज्जाचा चंद्र अनेक ठिकाणी पाहण्यात आला. अर्थात ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी चंद्रदर्शन झाले नाही. (Eid al-Adha will be celebrated on 21st July 2021, know why it is celebrated)

बकरीदची नमाज (Eid al-Adha 2021)

मीठी ईद म्हणजे ईद-उल-फितर नंतर ७० दिवसांनी बकरीदचा सण मुस्लीम धर्मीय लोक साजरा करतात. ईद अल-अधा भारत आणि जगभरात पारंपारिक उत्साहाने साजरा केला जातो. ईद-अल-अधा साजरा करताना मुसलमान मस्जिदमध्ये एकत्र जमतात आणि जमात सोबत २ रकात नमाज अदा करतात. हा नमाज नेहमी सकाळच्या वेळी आयोजित करण्यात येते.

बकरीद सणाच्या वेळेस काय होते?

बकरीदच्या दिवशी सर्वात आधी मस्जिदमध्ये नमाज अदा केली जाते. यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. कुर्बानीनंतर बकऱ्याचे मांस तीन भागांत वाटले जाते. यातील एक हिस्सा गरीबांना दिला जातो तर दुसरा हिस्सा मित्र आणि नातेवाईकांना दिला जातो. तिसरा हिस्सा स्वत:च्या कुटुंबासाठी ठेवला जातो.

मीठी ईद आणि बकरीद मध्ये काय फरक आहे?

मीठी ईद आणि बकरीद यामध्ये बरेच साम्य आहे. फक्त ईद-उल-फितर किंवा मीठी ईद आणि बकरीद मध्ये इतकाच फरक आहे की ईद-उल-फितर या सणाला आनंदाचा सण म्हणून पाहिले जाते. रमझान महिना संपल्यानंतरची एक भेट म्हणून ईद-उल-फितर साजरी केली जाते. तर ईद-अल-अधा म्हणजेच बकरीद गरीब आणि मुसलमान एकत्र येऊन साजरी करतात. कुर्बानीची संकल्पना आहे त्याचा अर्थ आहे की बकऱ्याचे मांस गरीबांना वाटण्यात यावे जेणेकरून त्यांना एकवेळचे चांगले जेवण मिळेल. नमाज अदा केल्यानंतर मुसलमान मेंढी किंवा बकऱ्याची कुर्बानी देतात. त्यानंतर आपले शेजारी, मित्र, नातेवाईक आणि गरीबांमध्ये त्याचे वाटप करतात.

बकरीदचे महत्त्व काय आहे?

मीठी ईद म्हणजे ईद-उल-फितरच्या जवळपास ७० दिवसांनी बकरीद साजरी केली जाते. बकरीद लोकांना सत्याच्या मार्गावर आपले सर्वस्व बलिदान करण्याचा संदेश देते. ईद अल-अधाला हजरत इब्राहिमच्या कुर्बानीच्या रुपाने साजरे केले जाते. हजरत इब्राहिम अल्लाहच्या आदेशावरून आपली निष्ठा दाखवण्यासाठी आपला मुलगा इस्माइलचे बलिदान देण्यासाठी तयार झाले होते. जेव्हा हजरत इब्राहिम यांनी आपल्या मुलाचे बलिदान देण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा अल्लाहने त्यांची निष्ठा पाहून इस्माइलच्या बलिदानाला बकऱ्याच्या कुर्बानीत परिवर्तित केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी