'या' पर्यटन स्थळी घ्या सरकारी गेस्ट हाऊसचा आनंद, फक्त...

लाइफफंडा
Updated Jul 12, 2022 | 17:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही भारतातील डोंगराळ भागात जात असाल तर येथे राहण्यासाठी गेस्ट हाऊस किंवा विश्रामगृहाचा पर्याय निवडा. तुम्हाला हे २००० पेक्षा कमी किंमतीत मिळतील.

स्वस्तात पर्यटन
'या' पर्यटन स्थळी घ्या सरकारी गेस्ट हाऊसचा आनंद, फक्त...  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • तुम्हाला हे २००० पेक्षा कमी किंमतीत मिळतील.
  • हे काही लोकांसाठी महाग आणि काहींसाठी स्वस्त्त असू शकतात.
  • सरकारी गेस्ट हाऊस हा उत्तम पर्याय आहे.

बहुतेक लोक भारताला भेट देण्यासाठी दऱ्या, पर्वत आणि हिमालयाकडे वळतात. अशाप्रकारे पर्यटनस्थळे प्रवाशांसाठी निवासाची सोयही करतात. हे काही लोकांसाठी महाग आणि काहींसाठी स्वस्त्त असू शकतात. हे सर्व पर्यटन स्थानाच्या लोकप्रियतेवर अवलंबून असते. पण तुम्हाला राहण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागू नये असे वाटत असेल तर सरकारी गेस्ट हाऊस हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग अशाच काही हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसबद्दल जाणून घेऊया जे तुमचा मुक्काम परवडणारा आणि सुट्ट्या संस्मरणीय बनवतील.

अधिक वाचा: Budget Honeymoon in India : देशातील या ठिकाणी बजेटमध्ये हनिमूनचे प्लॅनिंग होऊ शकते, नात्याची रोमँटिक सुरुवात

हे विश्रामगृह कसौनी येथे आहे. समुद्रसपाटीपासून १८९० मीटर उंचीवर वसलेले, कौसानी हे पर्वत त्रिशूल, नंदा देवी आणि पंचचुली यांसारख्या हिमालयाच्या शिखरांचे विहंगम दृश्य देते. या विश्रामगृहात कॉटेज, फॅमिली स्वीट्स आणि डबल बेड असलेल्या खोल्या आहेत. हॉटेलमध्ये गरम पाण्याचा पुरवठा, पार्किंग, रेस्टॉरंट यांसारख्या इतर सुविधाही उपलब्ध आहेत. येथे रुमची किंमत रु.१७२३ पासून सुरू होते.

धनौल्टी हे गेल्या काही वर्षांत पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. पर्वतांची सुंदर दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात. येथे बांधलेल्या धनौल्टी हाइट्समध्ये सर्व आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. जर तुम्ही धनौल्टी येथे जाणार असाल तर तुम्ही या विश्रामगृहात अवघ्या १५०० रुपयांमध्ये खोली घेऊन राहू शकता.

अधिक वाचा: बघा, हे आहे देशाचं असं मदिंर, जिथे भाविक येतात कर्जमुक्तीसाठी!

हॉटेल गढवाल टेरेस हे मसुरीमधील एक डिलक्स विश्रामगृह आहे, जे हनीमूनसाठी उत्तराखंडमधील सर्वात आवडते ठिकाण आहे. कुटुंबानुसार हे विश्रामगृह बनवले आहे. मॉल रोडवर असूनही या विश्रामगृहातील खोलीची किंमत १००० रुपयांपासून सुरू होते.

जर तुम्ही हिमाचल प्रदेशातील पोंटा साहिबला भेट देणार असाल, तर येथे बनवलेले यमुना पोंटा हे राहण्यासाठी एक चांगले आणि परवडणारे ठिकाण आहे. येथील बागेत उंचच उंच झाडे आहेत, येथे पर्यटक निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. येथे राहण्यासाठी तुम्हाला फक्त ९९० रुपये खर्च करावे लागतील. हे विश्रामगृह तुम्हाला इतक्या कमी किमतीत हॉटेल सारखी परिपूर्ण अनुभूती देईल.

अधिक वाचा: पावसाळ्यात ‘या’ रोमँटिक ठिकाणी लुटा मधुचंद्राचा आनंद; क्षण होतील यादगार

पश्चिम बंगालमधील कालिम्पेंग येथील मॉर्गन हाऊसमध्ये राहण्याचा आनंद तुम्हाला मिळेल. मॉर्गन हाऊस आर्मी गोल्फ कोर्सच्या शेजारी स्थित एक घर आहे. इथल्या खोल्या खूप छान सजवलेल्या आहेत आणि त्यात फायरप्लेस आहे. या हेरिटेज वास्तूतून तुम्हाला भव्य दरी आणि कांगचेनजंगाची दृश्ये पाहता येतात. येथे खोलीचे भाडे रु. १८०० पासून सुरू होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी