Low Electricity Bill With AC । मुंबई : यंदाच्या कडक उष्णतेसमोर काही प्रमाणात एसी (AC) देखील कमी पडतो की काय असा प्रश्न मनात येतो. एसी सतत लावला की वीज बिल पण दणकून येणार याची सर्वांना भीती असते. काही लोकांनी तर एवढा महागडा एसी पण घेतला नसेल जेवढा त्यांनी वीज बिल भरला आहे. दरम्यान आता गरमीपासून सुटका जरी होऊ शकत नसली तरी भलेमोठे वीज बिल नक्कीच टाळता येणार आहे. एसी (Air Conditioner) वापरताना तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. या टिप्सच्या मदतीने वीज बिल एक-दोन नव्हे तर अनेक पटीने कमी करता येऊ शकते. (Even if AC is turned on day and night, the electricity bill will be lower, Just follow these 5 things).
अधिक वाचा : जूनमध्ये बनतोय लक्ष्मी नारायण योग, या राशींचे चमकणार नशीब
लक्षात ठेवा की एसी तापमानात एक अंश देखील ६ टक्के वीज प्रभावित करते. तुम्ही तुमचा एसी एक अंशानेही वाढवलात, तर तुमच्या बिलात कित्येक टक्के फरक पडतो. एसीचे तापमान डिफॉल्ट सेटिंगवर ठेवल्यास विजेची बचतही चांगली होऊ शकते.
कडक उन्हात अथवा प्रचंड गरमीच्या दिवसांमध्ये एसी लावून बिछाना अंगावर घेऊन झोपणाऱ्या लोकांपैकी तुम्ही असाल तर तुम्ही मुद्दाम तुमच्या खिशातील पैसे घालवत आहात. एसीचे तापमान असे ठेवा की तुम्हाला उष्णताही जाणवणार नाही आणि ब्लँकेट पांघरण्याची गरजही भासणार नाही.
तुमच्या घरातील ज्या खोलीत AC लावला आहे त्याच खोलीत टीव्ही, फ्रीज आणि कॉम्प्युटर सारखी उपकरणे ठेवू नका कारण ते उष्णता निर्माण करतात आणि तुम्हाला एसीचे तापमान आणखी वाढवण्यास भाग पाडतात. तसेच एसी चालवताना खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा जेणेकरून एसीचा थंडावा खोलीत टिकून राहील. ते पर्यावरणासाठीही चांगले राहील.
एसीच्या योग्य देखभालीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एसीचे घाणेरडे फिल्टर स्वच्छ केल्याने ऊर्जेचा जास्त वापर टाळता येईल. याचा तुमच्या बिलावरही परिणाम होईल. एसी नलिका आणि व्हेंट्स स्वच्छ ठेवल्याने वीज कमी खर्च होते.
गरमीचा त्रास सर्वांनाच जाणवत असतो म्हणून त्यासाठी आपल्या रूमला शिमला बनवण्याची काही गरज नाही. तुम्ही मध्यरात्री एसी बंद करून पंखा चालवू शकता किंवा एसीचे तापमान वाढवून पंख्यामधून हवा घेऊ शकता, ज्यामुळे एसीचे बिल बर्याच प्रमाणात कमी होऊ शकते.