Relationship Tips : कोणत्याही पत्नीला पतीच्या या गोष्टी आवडत नाहीत

Husband-Wife : पती (Husband) आणि पत्नीमध्ये (Wife) अनेकदा भांडणे होतात, वाद होतात. बऱ्याचवेळा यामागची कारणे क्षुल्लक असतात. तुम्हीदेखील अनेकदा तुमच्या पत्नीशी छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालता का? तुमच्या बायकोला इतका राग का येतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरे तर ज्या गोष्टींना तुम्ही छोटी गोष्ट मानता, त्या गोष्टी बायकोसाठी लहान नसतात.

Relationship Tips
रिलेशनशिप टिप्स  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • नातेसंबंध सांंभाळणे खूप कठीण असते
  • पती- पत्नीचे नाते गुंतागुंतीचे असते
  • पत्नीला नेमक्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत

Relationship Tips : नवी दिल्ली : पती पत्नीचे नाते हे अतिशय गुंतागुंतीचे असते. हे नाते (Relationship)सर्वात नाजूक नाते असते. त्यामुळेच या नात्यात विश्वास, संयम, समजूतदारपणा, प्रेम या गोष्टींची आवश्यकता असते. पती (Husband) आणि पत्नीमध्ये (Wife) अनेकदा भांडणे होतात, वाद होतात. बऱ्याचवेळा यामागची कारणे क्षुल्लक असतात. तुम्हीदेखील अनेकदा तुमच्या पत्नीशी छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालता का? तुमच्या बायकोला इतका राग का येतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरे तर ज्या गोष्टींना तुम्ही छोटी गोष्ट मानता, त्या गोष्टी बायकोसाठी लहान नसतात. कारण पुरुषांच्या आवडनिवडी आणि महिलांच्या आवडीनिवडी यांच्यात फरक असतो. तुम्हाला अनेकदा असे वाटते की तुम्ही काही गंमतीत बोलत आहात. मात्र तुमच्या पत्नीला या गोष्टीचा कदाचित राग येत असेल. तुमची पत्नी तुमच्या बोलण्याने दुखावली जात असेल. त्यामुळे तुम्ही पत्नी चेष्टा मस्करी किंवा विनोद करताना या गोष्टींचे भान ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही पत्नीला या गोष्टी आवडत नाहीत. त्यामुळे पत्नीला काय आवडते किंवा काय आवडत नाही हे समजून घ्या. (Every wife do not like these things about husband)

अधिक वाचा  : दरीत अडकलेला बैल 25 दिवसांनी सुरक्षित बाहेर काढला

पत्नीच्या माहेरची माणसे
कोणत्याही महिलेला तिच्या माहेरचा अभिमान असतो. त्यामुळे तुम्ही तिच्या माहेरच्या व्यक्तींशी कसे वागता हे खूप महत्त्वाचे असते. जर तुम्ही नेहमी पत्नीच्या घरातील सदस्यांची चेष्टा करत असाल किंवा त्यांच्यावर टीका करत असाल तर तुमच्या पत्नीला हे अजिबात आवडत नाही.

अधिक वाचा  : आज तुळशीचे पानं तोडणं आहे महापाप, जाणून घ्या कारण

पत्नीच्या शरीराबद्दल नकारात्मक गोष्टी
तुमची पत्नी तुमच्या सर्व अपेक्षानुरुप असेलच असे नाही. हे खरे आहे की कोणीही नेहमी एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करू शकत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण नेहमी आपल्या पत्नीचे दोष शोधले पाहिजे. अनेकदा पत्नीची स्थूलपणा, उंची, वर्ण इत्यादींबद्दल नकारात्मक कमेंट करत राहिल्यास बायकोची नाराजी आणि राग या दोन्ही गोष्टी वाढतात.

दुसऱ्या महिलेची स्तुती
कोणत्याही पत्नीला आपल्या पतीने दुसऱ्या महिलेची केलेली स्तुती आवडत नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले नक्कीच असते पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या पत्नीची तुलना तुमच्या शेजारी किंवा नातेवाईकाशी कराल. असे केल्याने तुमची पत्नी दुखावली जाते आणि यातून तुमची पत्नी दुखावली जाते हे लक्षात घ्या. 

अधिक वाचा  : पुलकित सम्राटच्या प्रेयसीचं फोटोशूट पाहून सगळेचं चक्रावले

पत्नीच्या कामावर टीका करणे
प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण नसतो. बायकोने केलेले कोणतेही काम तुम्हाला योग्य वाटत नसेल तर ते सांगण्याची पद्धत योग्यच असावी. अनेकदा पत्नीचे काम न आवडल्यास काहीजण खूप कठोर भाषेत किंवा दुखवणाऱ्या भाषेत टीका करतात. तुला कोणतेही काम येत नाही असे तुम्ही तुमच्या पत्नीला सांगत राहिलात, तर त्यामुळे तुमचे नाते बिघडेल, कोणतेही काम नीट होणार नाही. पत्नी तुमच्यावर नाराज होईल.

पती पत्नीच्या नात्यातील गुंतागुंत समजून घेत तुम्ही व्यवहार केला तर हे नाते निभावणे होते आणि त्यात तणाव निर्माण होत नाही. एकमेकांच्या विचारांना आणि मतांना स्थान देत आदर राखल्यास नात्यात गोडवा टिकून राहतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी