Extra Marital Affair | लग्नानंतर अफेअर झाल्यास काय होतो वैवाहिक जीवनावर परिणाम, ३ महिलांची कथा

Affairs in Married life: लग्नानंतर जर पती-पत्नीच्या नात्यात (Extra Marital Affair) असा प्रकार घडला तर त्यांचे संसारी आयुष्य नरकासमान होते. लग्नानंतर आपल्या जोडीदाराचे अफेअर असल्याचे उघड झाल्यानंतर काही लोक घटस्फोट (Divorce) घेण्याचा निर्णय घेतात तर काही लोक त्या नात्याला पुन्हा एक संधी देण्याचे ठरवतात. अर्थातच सर्व विसरून पुन्हा नव्याने नाते सुरू करणे , त्या नात्याला एक संधी देते हे काम सोपे नसते. पाहूया ३ महिलांची कहाणी ज्यांना अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागले.

Extra Marital Affair
विवाहबाह्य संबंधांचे परिणाम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • विवाहाचे नाते प्रेम, विश्वास यावर टिकलेले असते
  • जोडीदाराने विश्वासघात केल्यास या नात्याला जडा जातो आणि मग संसार करणे अशक्य होऊन बसते
  • विवाहबाह्य संबंधांचा संसार झालेला परिणाम सांगणाऱ्या तीन महिलांच्या कथा

Affairs in Married life| नवी दिल्ली: विवाह बंधन (Marriage) हे एक पवित्र नाते आहे आणि ते विश्वास, प्रेम (Love, Trust) यावर टिकलेले असते. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात मग ती पुरुष असो की महिला आपला जोडीदार (Life Partner) ही सर्वात महत्त्वाची व्यक्ती असते. मात्र अशा नात्यात जर विश्वासघात, कट आणि बेईमानीचे आगमन झाले तर ते नाते संपण्यास वेळ लागत नाही. लग्नानंतर जर पती-पत्नीच्या नात्यात (Extra Marital Affair) असा प्रकार घडला तर त्यांचे संसारी आयुष्य नरकासमान होते. लग्नानंतर आपल्या जोडीदाराचे अफेअर असल्याचे उघड झाल्यानंतर काही लोक घटस्फोट (Divorce) घेण्याचा निर्णय घेतात तर काही लोक त्या नात्याला पुन्हा एक संधी देण्याचे ठरवतात. अर्थातच सर्व विसरून पुन्हा नव्याने नाते सुरू करणे , त्या नात्याला एक संधी देते हे काम सोपे नसते. पाहूया ३ महिलांची कहाणी ज्यांना अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागले. (Extra Marital Affair | Married life becomes hell after one of partner betrays another, 3 stories of affairs)

१. माझ्या नवऱ्याने माझा विश्वासघात केला, तर मी पण वन नाइट स्टॅंडचा अवलंब केला

३४ वर्षांच्या सुप्रिया म्हणतात की माझ्या माझ्या नवऱ्याचे संबंध त्यांच्या सेक्रेटरीशी होते. ते माझा विश्वासघात करत होते. हे सर्व पाहिल्यानंतर मीदेखील ठरवले की आता मी चांगली पत्नी असण्याच्या फंदात पडणार नाही. पतीला अद्दल घडवण्यासाठी मीदेखील दुसऱ्या एका पुरुषाबरोबर वन नाइट स्टॅंडचा अनुभव घेतला. मला माझ्या त्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. हे सर्व घडत असताना आम्ही दोघे रडलो आणि एकमेकांवर आरोप केले. नंतर आम्ही यातील चूक लक्षात घेतली आणि पुढील वाटचाल करण्याचे ठरवले.

२. मी नवऱ्याला खरे सांगितले की आता पहिल्यासारखे काहीही नाही

३६ वर्षांच्या पूजा सांगतात की मी आपल्या पतीचा विश्वासघात केला आहे. कारण त्याने क्वचितच माझ्याकडे लक्ष दिले किंवा माझ्यावर प्रेम केले असेल. मला त्याच्याकडून प्रेम, जिव्हाळा याची भीक नको होती. त्यामुळेच मी त्याचा विश्वासघात केला. मात्र असे केल्यानंतर मला खूपच पश्चाताप झाला आणि मी माझ्या नवऱ्याला सर्वकाही खरे ते सांगितले. त्यानंतर आमचा संसार नाइलाजाने सुरू असलेल्या नात्यासारखा सुरू होता. माझ्या नवऱ्याने मला एवढेदेखील विचारले नाही की मी असे का केले?

३. मी नवऱ्याला कारमध्ये तिला किस करताना पाहिले आणि माझे भान हरपले

४३ वर्षांच्या शालिनी आपल्या संसाराबद्दल सांगतात, एक वेळ अशी होती की माझा नवरा मला फसवतो आहे हे मला कळले होते. तेव्हापासून मी त्याच्याशी बोलणे बंद केले होत, गरजेचे गोष्टींसाठी मी त्याला मेसेज करून सांगायची. कारण त्याला पाहिले की मला एकच दु:ख सतता जाणवायचे ते म्हणजे त्याने मला फसवले. त्यानंतर आम्ही दोघेही सहमतीने कपल थेरेपीसाठी तयार झालो. त्यानंतर हळूहळू मी त्याला माफ केले. आता आमचा संसार सुरळीत सुरू आहे.

विवाहबाह्य संबंधांमुळे अनेकवेळा पती-पत्नीचे नाते अतिशय विषारी होऊन बसते किंवा हे नाते संपते. अनेकवेळा घटस्फोटातून पुढे वाटचाल केली जाते. एकमेकांच्या चुका माफ करत पुढे संसार करणे मात्र फारच कठीण असते आणि ते फारच थोड्या जणांना शक्य होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी