Feng Shui Tips: तुमच्या घराला कोणाचीही वाईट नजर लागू नये यासाठी करा हे उपाय, नक्कीच पडेल फरक

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Sep 21, 2022 | 15:40 IST

Astrology 2022: फेंगशुईमध्ये (Feng Shui) अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचे पालन करून तुमच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम येईल. यामध्येही नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) नष्ट करून सकारात्मक ऊर्जेचा (Positive Energy) प्रवाह वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.

Feng Shui Tips
घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय 
थोडं पण कामाचं
  • फेंगशुईमध्ये (Feng Shui) अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचे पालन करून तुमच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम येईल.
  • नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) नष्ट करून सकारात्मक ऊर्जेचा (Positive Energy) प्रवाह वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
  • वास्तुशास्त्राप्रमाणेच लोक फेंगशुईवरही खूप विश्वास ठेवू लागले आहेत. घरामध्ये ठेवलेल्या सर्व वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात.

मुंबई: Feg Shui Tips In Marathi: फेंगशुईच्या उपायांनी (Feng Shui solutions)  वास्तूमधील सकारात्मक ऊर्जा वाढवता येते.  फेंगशुई हे चिनी (Chinese) वास्तुशास्त्र आहे. फेंगशुईमध्ये (Feng Shui) अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचे पालन करून तुमच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम येईल.  यामध्येही नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) नष्ट करून सकारात्मक ऊर्जेचा (Positive Energy) प्रवाह वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. वास्तुशास्त्राप्रमाणेच लोक फेंगशुईवरही खूप विश्वास ठेवू लागले आहेत. घरामध्ये ठेवलेल्या सर्व वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात, घर सजवण्यासाठी काही गोष्टी फेंगशुईमध्येही सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी नियमानुसार ठेवल्याने व्यक्तीचे नशीब उजळते.

असं म्हटलं जातं की, फेंगशुईच्या टिप्सचे पालन केल्याने घरात सुख-शांती राहते आणि माता लक्ष्मीची आशीर्वाद कायम राहतो. फेंगशुईमध्ये गुडलकसाठी अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांना घरी आणून सजवल्याने कुटुंबातील सदस्यांचे नशीब बदलते. एवढंच नाही तर घरावर कोणाची वाईट नजर असेल तर तीही निघून जाते. आज आम्ही फेंगशुईशी संबंधित मेनगेटचे (मुख्यदार) काही उपाय सांगणार आहोत. त्यांचा वापर करून तुमची घरातील वाईट नजर दूर करता येईल. तसेच कुबेर देवाची कृपा घरातील सदस्यांवरही राहील.

अधिक वाचा-  मनुक्याचे पाणी स्किनसाठी ठरतं बेस्ट, फक्त करा असा वापर

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या फेंगशुई टिप्स वापरून पहा

  1. घरातील सर्वांनी प्रवेश घराच्या मुख्य दरवाजातूनच करावेत. म्हणजेच जाण्यासाठी एकच मार्ग असावा. तसेच, सूर्यप्रकाश थेट गेटमधून येतो हे लक्षात ठेवा.
  2. फेंगशुईच्या तज्ज्ञांच्या मते, घराच्या मुख्य गेटसमोर किंवा त्याच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचे गॅरेज किंवा इतर दरवाजा नसावा.
  3. घरासमोर एखादा खांब असेल तर तो तोडण्याऐवजी त्यावर आरसा लावा, असे म्हणतात. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.
  4. घराचे मुख्य गेट नेहमी स्वच्छ ठेवावे. तुमच्या मुख्य दरवाजातून कोणत्याही प्रकारचा आवाज येत तर तो त्वरित दुरुस्त करा. त्याकडे दुर्लक्ष केल्यास घरातील तणाव वाढतो.
  1. घराभोवती कचरा साचू देऊ नका. असे म्हणतात की देवी लक्ष्मीचे आगमन मुख्य दरवाजातून होते. अशा परिस्थितीत घराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे स्वच्छ असावा. 
  2. घरात प्रवेश करण्यापूर्वी घराबाहेरील शूज आणि चप्पल काढा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.
  3. जर घराला मागचा दरवाजा देखील असेल तर लक्षात ठेवा की हे दोन्ही दरवाज्यांची बाजू एकमेकांन समोर नसावी. असे झाल्यास मुख्य गेटमधून घरात प्रवेश करणारी सकारात्मक ऊर्जा मागच्या दरवाज्यातून बाहेर पडते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी