Feng Shui Tips : फेंगशुईच्या उपायांनी आर्थिक सुबत्ता येईल, रिकाम्या तिजोरीत पैसा येईल

Feng Shui Tips : फेंगशुईच्या उपायांनी वास्तूमधील सकारात्मक ऊर्जा वाढवता येते. तसेच आपल्या अडचणी दूर करणे, माणसातील आत्मविश्वास वाढवणे हे करता येते.

Feng Shui Tips in marathi
फेंगशुईच्या उपायांनी आर्थिक सुबत्ता येईल 
थोडं पण कामाचं
 • Feng Shui Tips : फेंगशुईच्या उपायांनी आर्थिक सुबत्ता येईल, रिकाम्या तिजोरीत पैसा येईल
 • फेंगशुई म्हणजे काय?
 • फेंगशुईतील महत्त्वाचे नियम

Feng Shui Tips : फेंगशुईच्या उपायांनी वास्तूमधील सकारात्मक ऊर्जा वाढवता येते. तसेच आपल्या अडचणी दूर करणे, माणसातील आत्मविश्वास वाढवणे हे करता येते. नकारात्मक ऊर्जेची तीव्रता कमी करता येते. ज्या वास्तूत वारंवार वाद आणि मतभेद होत असतील त्या वास्तूत फेंगशुईचे उपाय करणे हिताचे आहे. यामुळे वाद मिटून सामंजस्य निर्माण होण्यास मदत होते. 

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

Lucky Plants : 'चांगले दिवस' येण्यासाठी घरात लावा ही चार झाडं

फेंगशुई म्हणजे काय?

फेंग शुई किंवा चीनी भूगर्भशास्त्र ही एखाद्या व्यक्तीच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी उर्जा शक्तींचा वापर करण्याची पारंपरिक प्रथा आहे. फेंगशुई आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरते.

Mirachi Upay : नोकरी मिळत नाही ? लाल मिरचीचा करा उपाय आणि मिळेल यश

फेंगशुईतील महत्त्वाचे नियम:

 1. फेंगशुईनुसार घर मंदिराजवळ असू नये आणि मंदिराजवळ असेल तर त्या मंदिराची अथवा मंदिराच्या ध्वजाची सावली घरावर पडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
 2. घराचा मागील दरवाजा आणि पुढील दरवाजा हे समोरासमोर येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
 3. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ खांब असू नये. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आरसा लावू नये.
 4. स्वयंपाकघर आणि शौचालय हे समोरासमोर असणे फेंगशुईनुसार वाईट आहे. जर आपल्या घरात अशी स्थिती असेल तर शौचालयाच्या दाराजवळ एक ख्रिस्टल बॉल लावावा. यामुळे नकारात्मक ऊर्जेची तीव्रता कमी होण्यास मदत होते.
 5. घराच्या मध्यभागातून पायऱ्यांची व्यवस्था नसावी. यामुळे घरातील मुख्य कर्त्याला त्रास होण्याचा धोका असतो, असे फेंगशुई सांगते. 
 6. फेंगशुईनुसार ऑफिसच्या खुर्चीच्या पाठीचा भाग किंचित उंच असावा. तसेच आपल्या पाठीमागे ठोस भिंत असावी. यामुळे संबंधित व्यक्तीची ऑफिसमध्ये प्रगती होते आणि त्या व्यक्तीला सहकाऱ्यांचे सहकार्य लाभते.
 7. घर आणि ऑफिसमध्ये खिडक्यांचे दरवाजे बाहेरच्या दिशेने उघडणे आवश्यक. यामुळे संबंधित वास्तूत सकारात्मक ऊर्जेची तीव्रता वाढते.

फेंगशुईनुसार वस्तू आणि त्यांचे अर्थ

 1. फूल : फेंगशुईनुसार सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतिक.
 2. फळ : फेंगशुईनुसार सफरचंद, डाळिंब, संत्र ही फळे दीर्घायुष्य, समृद्धी, संपत्ती आणि प्रजनन यासाठी उपयुक्त
 3. पक्षी : फेंगशुईनुसार पक्षी हे प्रेरणा, स्वातंत्र्य आणि एकतेचे प्रतीक. पक्ष्यांमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते
 4. फुलपाखरू : फेंगशुईनुसार प्रेम आणि रोमान्ससाठी फुलपाखराचे चित्र किंवा चिन्ह सोबत ठेवण्याचा सल्ला देतात.
 5. घोडा : फेंगशुईनुसार यश, प्रसिद्धी, स्वातंत्र्य आणि गतीचे प्रतिक आहे घोडा
 6. मासा : फेंगशुईनुसार एरोवाना, गोल्डन फिश आणि ड्रॅगन फिश हे शक्तिशाली मासे.
 7. कासव : काळे कासव फेंगशुईमधील शक्तिशाली प्राणी.
 8. वटवाघूळ : सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी