Relatives Issue:आपण नेहमी पाहत असतो की, अनेक पालक त्यांच्या मुलांविषयी चिंतेत असतात. त्याचा सोन्या, पिंटू, दादा, नातेवाईकांकडे जात नाही. नातेवाईकांची (Relatives) मुलं आपल्याकडे येत नाहीत म्हणून त्या मुलांच्या पालकांकडे (parents) तक्रार देखील करतात. असा अनुभव तुम्हालाही आलाय ना? लहान मुलेही बहुतेकदा आपल्या नातेवाईकांच्या घरी जाण्यास नाकमोडत असतात. नातेवाईकांकडे जाण्यास ते तयार का नसतात. याचा विचार तुम्ही कधी केलाय का? जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसेल तर काळजी नको, आम्ही त्याचे उत्तर देत आहोत.(Find out all the reasons why your son won't go to relatives)
या प्रश्नांची उत्तरे ब्रिटनमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात सहज मिळू शकतात. सध्या ख्रिसमससाठी लोक खूप उत्सुक आहेत, पण याच दरम्यान ब्रिटनमध्ये झालेल्या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. जाणून घेऊया तरुण मुलं नातेवाईकांच्या घरी जाण्यास का इच्छुक नसतात?
अधिक वाचा : मुंबईत भररस्त्यात कोरियन यूट्यूबरचा विनयभंग, 2 अटकेत
तरुण मुलं नातेवाईकांना भेटणे का टाळतात, या प्रश्नाचे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. याचे उत्तर म्हणजे नातेवाईकांकडून तरुणांना विचारण्यात येणारी वैयक्तिक प्रश्न, उदाहरणार्थ तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अविवाहित लोकांना तुम्ही लग्न कधी करणार असे विचारले जातात. नोकरी करता का, कुठे नोकरी करता, किती पगार आहे. आवडीची मुलगी किंवा मुलगा मिळाला का? इत्यादी प्रश्नांना तरुण मुलं-मुली वैतागत असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सुमारे 57 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की जवळजवळ प्रत्येक नातेवाईक समान प्रश्न विचारतो, ज्यामुळे त्यांना उत्तर देण्यास अस्वस्थ वाटते.
अधिक वाचा : राज्याच्या सीमाभागातील गावांना आवडे शेजारील प्रांत
सर्वेक्षणातील 41 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, अनेक नातेवाईक त्यांच्या लव्ह लाईफबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात, जे त्यांच्यासाठी खूपच विचित्र असते. त्या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्यांना विचित्र वाटत असतं. तरुणांना त्यांच्या नातेवाईकांनी, असे प्रश्न विचारावेत असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे त्यांना नातेवाईकांकडे जायला आवडत नाही.
तरुणांचे म्हणणे आहे की, अनेक नातेवाईक त्यांच्या केसांच्या आणि कपड्यांच्या रंगावर कमेंट करतात, ज्या त्यांना अजिबात आवडत नाहीत. काय घालायचे काय नाही हा आमचा निर्णय असतो असं ते तरुण-तरुणी म्हणत असतात. यामुळे नातेवाईकांच्या या प्रश्नांना टाळण्यासाठी ते कोणाकडे जात नाहीत.
अधिक वाचा : केंद्रीय आरोग्यमंत्री धडकल्या उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात..
तरुणांना नातेवाईकांकडून करिअरविषयी बोलणे आवडत नसल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर 30 टक्के लोक म्हणतात की, कोणत्याही सणाला आणि कौटुंबिक कार्यक्रमात असे प्रश्न विचारणं तरुणांना आवडत नाही. अशाप्रसंगी पैसा आणि राजकारणावर कसलीही चर्चा करणं त्यांना आवडत नाही. म्हणूनच त्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटायला आवडत नाही.
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ.मनिषा गौर म्हणतात की, अशी प्रकरणे केवळ भारतातच नाहीत तर ब्रिटनमध्येही येत असतात. किशोरवयीन मुले आणि मुली नातेवाईकांच्या प्रश्नांनी हैराण झाले आहेत. त्यांना करिअरबद्दल बोलायचे नाही, हा तारुण्याची वेळ ही भावनिक असते. ते स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करतात.अशा स्थितीत त्यांना करिअर, फॅशन वगैरेवर बोलायचे नसते.
या प्रश्नांनी ते हैराण होतात, कधी डिप्रेशनमध्ये जातात. कुटुंबाने या गोष्टींकडे लक्ष देणे आणि मुलांशी पूर्ण बोलणे आवश्यक असते. त्यांना समजावून सांगा. ज्या मुलांना परीक्षेत कमी गुण मिळतात, अशा मुलांमध्ये या समस्या जास्त असतात. अशा परिस्थितीत आपण प्रश्न कमी करू शकत नाही. परंतु मुलांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. समतोल पालकत्व आवश्यक असते. हे करू नका आणि ते करा असं करण्यापेक्षा मुलांच्या आवडी समजून घेतल्या पाहिजेत.
टीपा : या लेखात सादर केलेल्या सल्ला केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक सल्ला म्हणून घेऊ नये.