Relationship Tips: जाणून घ्या कोणत्या प्रकारचे पुरुष महिलांना जास्त करतात आकर्षित, तुमच्यात आहेत का हे गुण?

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jul 21, 2022 | 14:46 IST

Things That Attract A Woman: स्त्रिया (women) आणि पुरुषांमध्ये (Men) आकर्षण नेहमीच असते, परंतु स्त्रियांना विशिष्ट प्रकारचे पुरुष अधिक आवडतात. जाणून घ्या पुरुषांमधील कोणता गुण महिलांना आकर्षित करतो.

Relationship Tips
पुरुषांच्या या गुणांमुळे महिला होतात आकर्षित   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पुरुषांची वर्चस्वाची विचारसरणी स्त्री-पुरुष संबंधात दिसून येते.
  • स्त्री आणि पुरुष यांच्यात जनुकीयदृष्ट्या खूप फरक आहे.

What Attracts A Women To A Men: देवाने स्त्री (Women) आणि पुरुष (Men) एकमेकांना समान बनवले आहेत. हे जग पुढे नेण्याची जबाबदारी स्त्री आणि पुरुष दोघांनाही देण्यात आली आहे. एकमेकांच्या सहकार्याशिवाय दोघेही काहीही करू शकत नाहीत. इतिहासात असा उल्लेख आहे की, प्राचीन काळी स्त्रिया अधिक सामर्थ्यवान होत्या आणि त्यांचीच खूप चलती होती. पण हळूहळू खूप बदल झाले आणि पुरुषांचे वर्चस्व सुरू झाले. आज जगाच्या बहुतांश भागात पुरुषांचे वर्चस्व आहे. पुरुषांची तीच वर्चस्वाची विचारसरणी स्त्री-पुरुष संबंधात दिसून येते. 

अनुवांशिक बनावट

स्त्री आणि पुरुष यांच्यात जनुकीयदृष्ट्या खूप फरक आहे. महिलांना संवेदनशील आणि नाजूक बनवले आहे, तर पुरुषांना नेतृत्व आणि वर्चस्व गाजवण्याची अधिक क्षमता दिली आहे. अशा परिस्थितीत पुरुष स्वत:हून वेगळ्या संवेदनशील स्त्रियांकडे आकर्षित होतात, तर स्त्रियांना आपला अधिकार व्यक्त करणाऱ्या पुरुषांवर वर्चस्व आवडते.

Read Also : मेळाव्यात ठाकरेंना पाठिंबा, नेत्यांची पाठ फिरतातच...

संशोधन काय सांगते

कॅलिफोर्निया इर्विनच्या संशोधकांनी एक संशोधन केले की महिला आणि पुरुष त्यांच्या जोडीदाराची निवड करताना लोकांना कसे प्राधान्य देतात. . यासाठी स्पीड डेटिंग चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये असे दिसून आले की बहुतेक पुरुषांनी शांत आणि संवेदनशील महिलांसोबत पुन्हा डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. दुसरीकडे, स्त्रिया अधिक ठाम आणि अधिक बोलक्या स्वभावाच्या पुरुषांद्वारे अधिक आकर्षित झाल्या.

Read Also : ट्रकच्या धडकेनं गर्भवती महिलेचं फाटलं पोट

या आकर्षणाचे कारण काय आहे

यामागचे कारण हे असू शकते की स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक बनू इच्छितात.  म्हणजेच जे पुरुष बाहेरून कणखर आणि वर्चस्ववादी दिसतात, ते आतून सहानुभूती आणि प्रेम शोधत असतात.  म्हणूनच तो संवेदनशील महिलांकडे आकर्षित होतो. दुसरीकडे, सौम्य आणि संवेदनशील स्त्रिया अशा जोडीदाराचा शोध घेतात ज्याच्यासोबत त्यांना मजबूत आणि सुरक्षित वाटेल अशा पुरुषांकडे आकर्षित होत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी